Ramayana Teaser RAMA FIRST LOOK OUT Saam tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

RAMA FIRST LOOK OUT: रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ४,००० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून आता या चित्रपटातील रणबीरची झलक समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Ramayana Teaser: गेले वर्षभर ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची झलक अखेर समोर आली आहे. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी हा खास टिझर प्रदर्शित करत चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला. या झलकमध्ये रणबीर कपूर प्रभू रामा यांच्या भूमिकेत दिसत असून त्याचा लूक पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत.

सुमारे २ मिनिटे २८ सेकंदांचा हा व्हिडिओ केवळ पात्रांची ओळख करून देत नाही, तर चित्रपटाच्या भव्यतेचीही झलक दाखवतो. सुरुवातीला रामाचा डौलदार अवतार, हातात धनुष्य घेतलेला रणबीर कपूर आणि त्याच्यावर होणारा फुलांचा वर्षाव हे दृश्य प्रेक्षकांना भावूक करते. त्यानंतर वनवास, अयोध्येतील जनसमुदाय आणि राम-सीता-लक्ष्मण यांचा प्रवास अशा अनेक प्रसंगांची मांडणी यात पाहायला मिळते.

या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओच्या शेवटी ‘रॉकिंग स्टार’ यश साकारणाऱ्या रावणाचीही झलक दाखवण्यात आली पण चेहरा पूर्णपणे उघड करण्यात आलेला नाही.

चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटासाठी तब्बल ४,००० कोटी रुपयांचे बजेट असल्याचे सांगितले आहे. या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मिनिट १४ सेकंद होताच या टिझरमध्ये रणबीर कपूरचा प्रभू राम अवतार पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा येतो आणि याच क्षणाने संपूर्ण व्हिडिओचा हायलाइट ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elections : विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय घडामोडींना वेग; भाजपसह ३ प्रमुख पक्षांनी आधीच डाव टाकला

Foundation According Skin Type: स्किन टाइपनुसार निवडा परफेक्ट फाउंडेशन; मेकअप दिसेल परफेक्ट आणि ग्लोइंग

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघातील माजी संचालकांना सहकार विभागाचा दणका

... तर दोन मंत्री राजीनामा देतील, मित्रपक्षाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : उद्या नशीब देणार साथ की अडचणी वाढणार? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT