अयोध्या नगरीमध्ये सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pranpratistha Ceremony) सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' कंगना रनौतने (Kangana Ranaut) या सोहळ्याला उपस्थिती लावली. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर कंगना रनौतने एकच जल्लोष केला आणि मंदिर परिसरामध्ये जय श्रीरामचा जयघोष केला. सध्या सोशल मीडियावर कंगना रनौतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहचलेली कंगना रनौत खूपच सुंदर दिसत होती. तिने यावेळी रेड-ऑरेंज कलरची काठ असेलली ऑफव्हाइट कलरची साडी नेसली होती. या साडीवर हेवी वर्क करण्यात आले होते. कंगनाने या साडीवर मॅचिंग ब्लाऊज कॅरी केला होता. यासोबत तिने या साडीवर रेड कलरची सुंदर ओढणी देखील घेतली होती. ऑक्साइड कलरची ज्वेलरी तिने कॅरी केली होती. तिने ग्लोइंग मेकअप, मॅचिंग बांगड्या, सुंदर हेअरस्टाइल करत आपला लूक परिपूर्ण केला आहे. कंगना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
अयोध्येतील वातावरण सध्या राममय झाले आहे. कंगना रनौत देखील रामभक्तीमध्ये तल्लीन झाली आहे. कंगना रनौतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. कंगनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करतण्यात आली. त्याचवेळी कंगना रनौतने आनंदाच्या भरामध्ये जय श्रीरामचा एकच जल्लोष केला. कंगनाने जोरजोरामध्ये जयश्रीरामचा जयघोष करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कंगनाच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.
कंगना रनौतने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'राम आ गये', असे लिहिले आहे. कंगना रनौतच्या या व्हिडीओला अवघ्या ३८ मिनिटांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसंच चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओला पसंती देत कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहिले आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.