German Singer Sings Ram Aayenge Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Aayenge Song: जर्मनीच्या गायिकेने गायलं 'राम आएंगे' गाणं, सौंदर्यासोबत मधुर आवाजाचे झाले सारे दिवाने; एकदा VIDEO बघाच...

Ram Mandir Pranpratistha Ceremony: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जर्मनीच्या एका गायिकेने आपल्या मधुर आवाजामध्ये 'राम आएंगे' हे गाणं गायलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

German Singer Sings Ram Aayenge Song:

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी भगवान रामावर गाणी लिहिली आहेत. अनेकांनी आपल्या मधुर आवाजामध्ये गाणी गायली आहेत. तर काहींनी श्रीरामावर तयार करण्यात आलेल्या गाण्यात काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर श्रीरामाची अनेक गाणी चांगलीच व्हायरल होत आहेत. सध्या जास्त चर्चेत असलेलं गाणं म्हणजे 'राम आएंगे'. सोशल मीडियावर 'राम आएंगे' या गाण्यावर अनेक रील्स तयार केले जात आहेत. अशामध्येच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जर्मनीच्या एका गायिकेने आपल्या मधुर आवाजामध्ये 'राम आएंगे' हे गाणं गायलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जर्मन गायिका कॅसांड्रा माई स्पिटमॅनच्या (cassandra mae spittmann) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सध्या सर्वांची मनं जिंकली आहेत. या गायिकेने 'राम आयेंगे' हे गाणं गाऊन इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निळ्या डोळ्यांची गायिका कॅसांड्रा माई स्पिटमॅन 'राम आयेंगे' हे गाणं आपल्या मधुर आवाजामध्ये गाताना दिसत आहे. या गायिकेच्या आवाजामध्ये इतका गोडवा आहे की प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडले आहेत. या गायिकेने स्वत: हा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

एका नेटकऱ्याने गायिकेला विनंती केली होती की, 'तू 'राम आयेंगे' हे गाणं गाऊ शकते का?' या नेटकऱ्याला ती आनंदाने हो म्हणते. मग ती तिच्या सुंदर आवाजात 'राम आयेंगे' हे गाणं गाऊ लागते. या गायिकेचे गाणं ऐकून तुम्हाला देखील खूप आवडेल. ही पोस्ट 18 जानेवारीला शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून त्याला जवळपास २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला आतापर्यंत जवळपास 10,000 लाईक्स देखील मिळाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या या गायिकेच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या आवाजाचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, 'अप्रतिम. हिंदीत इतका छान आवाज आहे. आवाज खरोखर आश्चर्यकारक आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे सुंदर आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'भारत आणि जर्मनीमधील संबंधांचे असे प्रदर्शन.' आणखी एका युजरने कमेंट्स करत लिहिले की, 'तिचे हिंदी उच्चार अप्रतिम आहेत! देव तिला आशीर्वाद देओ.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT