Ram Gopal Varma On Kiara Advani  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Gopal Varma: 'ठरकी बुढ्ढा...'; कियारा अडवाणीच्या बिकिनी फोटोवर अश्लील कमेंटमुळे राम गोपाल वर्मा पुन्हा वादात

Ram Gopal Varma On Kiara Advani : चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी कारण ठरलं आहे अभिनेत्री कियारा अडवाणीचा बिकिनी फोटोवर वर्मा यांनी केलेली वादग्रस्त प्रतिक्रिया.

Shruti Vilas Kadam

Ram Gopal Varma: चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी कारण ठरलं आहे अभिनेत्री कियारा अडवाणीचा बिकिनी फोटोवर वर्मा यांनी केलेली वादग्रस्त प्रतिक्रिया. 'वॉर 2' टीझर रिलीज झाल्यानंतर कियाराचा समुद्रकिनाऱ्यावरचा बिकिनी फोटो व्हायरल झाला आणि त्यावर राम गोपाल वर्मा यांनी केलेली अश्लील टिपणी नेटिझन्सच्या रोषाचं कारण बनली.

'वॉर २' चा टीझर पाहिल्यानंतर, राम गोपाल वर्माने कियारा अडवाणीचा बिकिनी फोटो शेअर केला आणि लिहिले, "देश आणि समाजाऐवजी, हृतिक आणि ज्युनियर एनटीआर कियारा अडवाणीसाठी वॉर करणार आहेत. 'वॉर २' हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट असेल... हे निश्चित आहे." दिग्दर्शकाचे हे ट्विट लोकांना आवडले नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक सोशल मीडिया नेटकाऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र चालवलं. अनेकांनी त्यांना "ठककी बुढ्ढा", 'वेडसरखा माणूस', "स्त्रियांचा अवमान करणारा" अशा शब्दांत हिणवलं.

नेटकऱ्यांनी वर्मा यांचं वय, अनुभव आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना ट्रोल केलं. काहींनी तर त्यांच्यावर सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली. ही पहिली वेळ नाही की राम गोपाल वर्मा यांनी एखाद्या अभिनेत्रीबद्दल अश्लील वक्तव्य केलं आहे. याआधीही ते अनेकदा उर्मट ट्विट्स आणि पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

कियाराकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. मनोरंजन विश्वात महिला कलाकारांविषयी आदर बाळगणं अपेक्षित असताना, अशा प्रकारच्या वर्तनामुळे अनेकांनी वर्मांचा निषेध नोंदवला जात असल्यामुळे राम गोपाल वर्मा यांनी हे ट्विट डिलीट केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

Ahmedabad Student Death: आदल्या दिवशी १०वीच्या मुलीने 'सैयारा' पाहिला; दुसऱ्या दिवशी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

SCROLL FOR NEXT