Cannes Film Festival 2025: कॅन्स फिल्म फेस्टिव्हल २०२५मध्ये भारतीय अभिनेत्री रुचि गुज्जरने आपल्या पारंपरिक पोशाख आणि देशभक्तीच्या प्रतीकांनी सजलेल्या लुकसह सर्वांचे लक्ष वेधले. तिने राजस्थानच्या पारंपरिक सोन्याच्या लेहंगासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा असलेला खास नेकलेस परिधान केला होता, यामुळे तिच्या उपस्थितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
रुचिच्या या लुकमध्ये जयपूरच्या कारीगरांनी तयार केलेल्या गोटा-पट्टी, झरदोसी आणि आरशांच्या कामाने सजवलेल्या लेहंगाचा समावेश होता. तिच्या पोशाखाला पूरक असलेला बंधनी दुपट्टा 'झरीबारी'चे कारीगर राम यांनी तयार केला होता. पण, सर्वांचे लक्ष वेधले ते तिच्या गळ्यातील मोदींच्या चेहऱ्याचा नेकलेसने जो पारंपरिक राजस्थानी डिझाइनमध्ये तयार करण्यात आला होता, ज्याचे वर्णन तिने "भारताच्या जागतिक उभारणीचे प्रतीक" असे केले.
रुचि गुज्जर राजस्थानमधील मेहरा गुज्जरवास खे़त्री गावची रहिवासी असून, जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. बॉलीवूडमध्ये महिलांसाठी संधी मर्यादित असूनही, तिने 'जब तू मेरी ना रही', 'हेली में चोर' आणि 'एक लड़की' यांसारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या कुटुंबातील सुरुवातीच्या संकोचांनंतरही, तिच्या वडिलांनी तिला कायम पाठिंबा दिला आहे.
कॅन्समध्ये तिच्या 'लाइफ' या चित्रपटाचे प्रदर्शन झाले, ज्यामध्ये तिने निशांत मलकानीसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. चंद्रकांत सिंग दिग्दर्शित हा चित्रपट आत्महत्या आणि गर्भपात यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतो. रुचिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे मन जिंकले आहे. तिच्या या उपस्थितीने भारतीय पारंपरिक पोशाख आणि देशभक्तीचा संदेश जागतिक मंचावर पोहोचवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.