Ram Charan And Upasana Welcomes Baby Girl Instagram
मनोरंजन बातम्या

Ram Charan- Upasana Baby: रामचरण झाला बाबा, आजोबा चिरंजीवींचा आनंद गगनात मावेना..

Ram Charan And Upasana Welcomes Baby Girl: अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

Chetan Bodke

Ram Charan And Upasana Blessed With Baby Girl: अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आज सकाळी रामचरणच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी संध्याकाळी अभिनेता आणि त्याची पत्नी हैदराबादमधील रुग्णालयात एकत्र स्पॉट झाले होते. मंगळवारी पहाटे, त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी हॉस्पिटलने बुलेटिनमध्ये शेअर केली आहे. लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर राम चरण आणि उपासना आई-वडील झाले आहेत.

रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला ही हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. हॉस्पिटलने एक मेडिकल बुलेटिन शेअर करत रामचरणच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अपोलो रूग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले की, “रामचरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना मंगळवारी पहाटे (२० जून २०२३) अपोलो हॉस्पिटल जुबली हिल्स, हैदराबादमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि आई निरोगी आहेत.”

रामचरणचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस चाहत्यांना गुड न्यूज दिली होती, राम आणि उपासना त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी ट्विटरवरून म्हणतात, “श्री हनुमानजींच्या आशीर्वादाने, उपासना आणि राम चरण त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत असताना आम्हाला घोषणा करताना आनंद होतोय. आम्ही प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो, सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला. शोभना आणि अनिल कामिनेनी.”

Ram Charan And Upasana Blessed With Baby Girl

उपासनाने गुडन्यूज दिल्यानंतर दोघांच्याही घरी आनंदाला पारावार उरलेला नाही. रामचरणचे वडिल आणि टॉलिवूडचे सुपरस्टार चिरंजीवी आजोबा झाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आलंय. चिरंजीवी आणि पत्नी सुरेखा हे दोघेही आपल्या लाडक्या नातवाला पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून या गोड क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. रामने या वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखतीदरम्यान या जोडप्याला मुलगी होणार असल्याचे संकेत दिले होते.

चिरंजीवी हे टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांना सुष्मिता, श्रीजा आणि रामचरण ही तीन मुले आहेत. राम चरणचे १४ जून २०१२ रोजी लग्न झाले होते. त्याच्या लग्नाच्या ११ वर्षानंतर त्याला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. खूप वर्षांनतर त्यांच्या घरी पाळणा हलला असल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची एक गोड इच्छा पूर्ण झाली. रामचरणच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन झाल्याने अवघ्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT