Manoj Bajpayee Talks About Unfair Payment To Actors: ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजने ओटीटी विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला. या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत मनोज वाजपेयी होता. मनोज वाजपेयी या वेबसीरिजमुळे तुफान चर्चेत आला होता. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या वेबसीरिजमुळे मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे कौतुक आजही सर्वत्र होते. नुकतेच त्याने ओटीटी विश्वात काम करताना त्याच्या मनातील एक खदखद व्यक्त केली आहे.
मनोज वाजपेयीचा नुकताच ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सध्या मनोज वाजपेयी या चित्रपटामुळे तुफान चर्चेत आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकारांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे, त्यामुळे त्यांना मिळणार मानधनही मोठेच असेल असे सर्वांनाच सहाजिकच वाटते. पण यावर मनोज वाजपेयींनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली.
मनोज वाजपेयीला त्याच्या लोकप्रियते प्रमाणे मानधन भेटत असेल असे विचारल्यावर मात्र त्यांनी नकार दिला. त्यावर मनोज म्हणतो, "ओटीटीवाले फक्त मोठ्या स्टार कलाकारांनाच जास्त पैसे देतात. जेवढे पैसे मिळायला हवे तेवढे मिळत नाही. आम्हाला सलमान-शाहरुख एवढे पैसे मिळत नाही.
हॉलिवूडमधील ओटीटी स्टार ना मिळणाऱ्या मानधनाबद्दल मनोज म्हणतो, "गोरा व्यक्ती असेल तर त्यालाच शो करायला देणार. चीनमध्ये मोठ्या बॅंड्रसची फॅक्टरी आहे कारण की, तिथे मजुरी स्वस्त आहे. आम्ही ही त्यातलेच 'स्वस्त मजुर' आहोत. जेक रेयान शोसाठी खूप पैसे घेतो. पण त्या तुलनेत आम्हाला मिळणारे मानधन अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे.
'द फॅमिली मॅन' लोकप्रिय सीरीज आहे.'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये मनोज वाजपेयीने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेली 'द फॅमिली मॅन २'ही वेबसीरिजदेखील सुपरहिट ठरली. प्रेक्षकांना आता 'द फॅमिली मॅन ३' ची प्रतिक्षा आहे. द फॅमिली मॅनसाठी त्याला घरातून कायम विरोध होत होता.
मनोजच्या बायकोने द फॅमिली मॅन सीरीज न करण्यास सांगितले होते. तुम्ही चांगल्या करिअरची वाट लावत आहे, असंही तिने सांगितलं होतं. मनोजला द फॅमिली मॅन सीरीजसाठी अनेक नवीन काम आणि अनेक मोठे शो सोडावे लागल्याचेही त्याच्या पत्नीने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.