Rakhi Sawant Technique To Grow Tomatoes In 15 Days Instagram
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Planted Tomato Tree: अरे बापरे! राखीचा नवीन उद्योग; आता अभिनय सोडून सुरु केला नवीन व्यवसाय

Rakhi Sawant Viral Video: टोमॅटोचे भाव खूप वाढल्यामुळे अभिनेत्रीने एक रामबाण उपाय शोधला आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Technique To Grow Tomatoes In 15 Days: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत पब्लिसिटी मिळवण्यासाठी कधी काय करेल, याचा काय ठावठिकाणा नाही. कधी आपल्या विचित्र फॅशनमुळे तर कधी काही हटक्या पब्लिसिटी स्टंटमुळे राखी सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावरून थेट पंतप्रधानांनाच टोमॅटो, कांदाचे भाव कमी करण्यासाठी सांगितले. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावरून टोमॅटो महागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच तिने एक हटके विचार केला आहे...

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोशल मीडियावर “टोमॅटो ही काय महाग करण्याची गोष्ट आहे का? आता मी टोमॅटोची चटणी कशी बनवणार? माझं सॅलेड कसं बनवणार,” असं माध्यमांसोबत बोलताना राखी म्हणाली. टोमॅटोचे भाव खूप वाढल्यामुळे अभिनेत्रीने आता थेट टोमॅटोचं झाडचं लावले आहे. सध्या राखीचा झाड लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘विरल भयानी’ या सेलिब्रिटी फोटोग्राफरने राखीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राखीचा हा शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत राखी म्हणते, “मित्रांनो, मी आता टोमॅटोचं झाड लावतेय.”

तर तिला काही पापाराझींनी प्रश्न विचारला, ‘तुम्ही लावलेल्या टोमॅटोच्या झाडाला किती दिवसांत टोमॅटो येतील?’ तर राखीने हाच प्रश्न तिथल्या माळ्याला विचारला, त्यावेळी त्याने येत्या १५ दिवसात झाडाला टॉमेटो येणार असल्याचे सांगितले.

तर राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणते, “मी काही क्रांतिकारी नाही. मी टोमॅटो बनवणारी आणि भाजी विकणारी आहे. मी स्वतः आज एक टोमॅटोचं झाड लावलं आहे. येत्या १५ दिवसांत झाडाला टोमॅटो येतील, असं मला माळीने सांगितलं. त्यामुळे आता झाडाला इतके टोमॅटो येतील की, पुढचे सात जन्म ते माझ्या उपयोगात येतील.”

राखीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरता येत नाही. टोमॅटो इतके महाग आहेत, आणि तिकडे राखी टोमॅटो वाया घालवते असं काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काही युजर्स म्हणतात, राखी नेहमीच प्रकाशझोतात राहण्यासाठी काहीही करते. ड्रामाक्विन चर्चेत राहण्यासाठी काय करते, ते तिलाच माहित. तर काहींनी तिला आधी फार्मसी संबंधित अभ्यास कर आणि मग शेती कर असा सल्ला दिला.

सध्या राखी सोशल मीडियावर बरीच चर्चेत दिसत आहे. तिने गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानचं लग्न व्हावं यासाठी तिने डोक्यावर अंडी फोडले होते. सोबतच ती आदिल खानसोबत लग्न केल्यानंतर देखील चर्चेत आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT