Arshad Warsi On First Meeting With Jaya Bachchan: ‘मला वाटलं आता त्या ओरडणार’, अर्शदला का वाटत होती जया बच्चन यांची भीती; सांगितला पहिल्या चित्रपटाचा किस्सा

Arshad Warsi And Jaya Bachchan News: अर्शदने बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या संबंधित एक किस्सा सांगितला आहे.
Arshad Warsi On First Meeting With Jaya Bachchan
Arshad Warsi On First Meeting With Jaya BachchanSaam Tv
Published On

Arshad Warsi Recalls His 1st Meeting With Jaya Bachchan: अभिनेता अर्शद वारसी सध्या ‘असूर २’ या वेबसीरिजमुळे बराच प्रकाशझोतात आला आहे. यातील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. नुकतंच त्याने या वेबसीरिजनिमित्त दिलेल्या मुलाखतीत एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. अर्शदने बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या संबंधित एक किस्सा सांगितला आहे. अर्शद आणि जया बच्चन हे दोघेही (तेरे मेरे सपने) या डेब्यू चित्रपटासाठी पहिल्यांदा भेटले होते, त्यावेळी अर्शद खूपच घाबरला होता.

Arshad Warsi On First Meeting With Jaya Bachchan
Manny Coto Death: एमी पुरस्कार विजेते मॅनी कोटोचे गंभीर आजाराने निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने सांगितले की, दिग्दर्शक जॉय ऑगस्टीनने त्याला एक चित्रपट ऑफर केला होता, जो ABCL (अमिताभ बच्चन यांची निर्मिती कंपनी) साठी तो चित्रपट निर्मित केला जात होता. आपण आधीच प्रॉडक्शन हाऊससोबत बोललो असून अर्शदने त्याचे फोटो प्रॉडक्शन हाऊसला पाठवावेत अशी इच्छाही दिग्दर्शकाने बोलून दाखवली होती.

मुलाखतीत अर्शद वारसी म्हणाला, “दिग्दर्शकांनी सांगितलेले मी ऐकल्यावर त्या पिक्चरसाठी साफ नकार दिला होता, मी अभिनय करू शकणार असं देखील मी सांगितले. त्यामुळे मी माझे फोटो वैगेरे पाठवणार नाही. इथे असे लोकं येतात, ज्यांना फिल्म इंडस्ट्रीत यायचं असतं पण, त्यांना यश काही मिळत नाही, हे माहित आहे.

अशी सेलिब्रिटी रस्त्यावर दिसली की लोकं त्यांची कीव करत म्हणतात, ‘बिचारा गावातून हिरो बनायला आला, पण यशस्वी झाला नाही. आता पहा कसा बसमधू प्रवास करतोय, मला तसं माणूस बनायचं नव्हतं, अभिनयात मला रस नाही,’ ” हे थेट अर्शदने दिग्दर्शकासमोर स्पष्ट केलं होतं.

Arshad Warsi On First Meeting With Jaya Bachchan
Tejaswini Lonari Viral Photo: तेजस्विनीचा 'अफलातून' लूक, चित्रपटातील फोटो झाला व्हायरल

त्यानंतर अर्शदला जेव्हा जया बच्चन यांचा फोन आला. त्यानंतर अर्शदला ऑफिसमध्ये भेटायला सांगितलं. अर्शदने तो किस्सा सांगताना सांगितले, मला वाटलं होतं की त्या मला काढून टाकतील! मला वाटलं, हम्म, ठिक आहे जया बच्चन, अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत, एवढ्या मोठ्या व्यक्ती आहेत.

त्यांच्या तोंडून आपल्याला काही ओरडा मिळेल, पण ती देखील माझ्यासाठी आयुष्यातील मोठी शिकवण असेल. त्यामुळे मला कामावरून काढून टाकलं जाईल, असा विचारच मी करून गेलो, पण त्यांनी मला विचारलं की तू हिंदी बोलतो का? मी इंग्रजीत उत्तर दिलं, होय. मी हिंदी बोलू शकतो. त्यावेळी त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप भिती होती.

जया बच्चन मला म्हणाल्या, ठीक आहे.. तू या चित्रपटात आहेस. ते ऐकून मी अक्षरश: हैराण झालो. आता सगळं संपलं असंच मला वाटलं. अशा शब्दांत अर्शदने त्याला पहिला चित्रपट कसा मिळाला, त्याची कहाणी सांगितली.

अर्शदला चित्रपटात कास्ट का केलं? याचं कारण अर्शदने अनेक वर्षांनंतर जया बच्चन यांना विचारलं होतं. तेव्हा मला जया बच्चन म्हणाल्या, तुम्ही पाठवलेल्या ३६ फोटोंमध्ये प्रत्येक फोटोत वेगवेगळे भाव होते. त्यावरूनच माझी निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com