
Ranjeet Jog 2nd Wedding News: ‘रामायण’ फेम संजय जोग सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता संजय जोग यांचा मुलगा रणजित जोगमुळे सध्या अभिनेते चर्चेत आले. संजय जोगप्रमाणे त्यांचा मुलगा रणजित देखील मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. रणजित गुपचुप दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने अगदी साध्या पद्धतीत, मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत रणजितने प्रणाली धुमाळसोबत लग्नगाठ बांधली आहे.
स्टार प्रवाहावरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत रणजित मुख्य भूमिकेत असून त्याने त्याच्या लग्नासाठी मालिकेतूनदेखील काही काळासाठी ब्रेक घेतल्याची माहिती आहे. रणजित आणि प्रणालीच्या लग्नाचे फोटो अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टोरीवर शेअर केले होते. रणजित जोग आणि प्रणाली धुमाळ यांनी आपले लग्न मुंबईत केले नसून नागपूरमध्ये केले. लग्न मोजक्याच मित्रमंडळींमध्ये पार पडले असून या लग्नाची कुठेही चर्चा झालेली नाही.
टेलिव्हिजन अभिनेत्याच्या लग्नाची बातमी समजताच त्याच्यासह पत्नीवर देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजित जोगचे वडील संजय जोग हे मराठी- हिंदी सिनेसृष्टीत अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. रणजितच्या गेल्या चार पिढ्या सिनेसृष्टीत कायम सक्रिय आहे.
संजय जोग यांनी १९६५ मध्ये किडनी संबंधित काही आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. रणजितची आई नीता जोग या पेशाने वकील आहेत. २०१३मध्ये रणजित चे संयुक्ता सोबत पहिले लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरप अभिनेत्याने आता अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत दुसरे लग्न केले.
प्रणाली धुमाळच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या काही वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीसोबत तिचा संबंध आहे. गोल गोल गरा गरा, सावधान इंडिया, सोन्याची पावलं या मालिकेंतून तिने आपली ओळख निर्माण केली. रविवारी (९ जुलै) प्रणाली आणि रणजित या दोघांचा विवाहसोहळा नागपूर येथे पार पडला. या लग्नाला मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या लग्नाच्या बातमीने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.