Rakhi Sawant And Aadil Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: 'माझाच पती खोटारडा आहे, त्यामुळे मी...', म्हणत राखी आदिलवर कमालीची संतापली

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच राखीने आदिलसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता.

Chetan Bodke

Rakhi Sawant: गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत बरीच चर्चेत आली आहे. कधी पती आदिलमुळे तर कधी आईच्या आजारपणात राखी बरीच चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिने आदिलसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. तिने आपले लग्न टिकणार नसल्याचे ही सांगितले होते. यासर्व घडामोडींनंतर पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

या चर्चेनंतर पुन्हा एकदा राखीने आपल्या पतीच्या अफेअरबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी राखी आपल्या पतीवर टीका करत म्हणते, “आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू आहे. तनू मला तुझी लाज वाटते. आदिल आता त्या मुलीबरोबर राहत आहे. ‘तुला वाटत असले की, मी परत यावं, तर माफी माग, मी सर्व सोडून येईल.’ असं आदिल मला म्हणाला होता. पण तो परत आला नाही. दुसऱ्याच्या पतीला चोरून त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्या मुलीला लाज वाटायला पाहिजे. माझाच पती खोटारडा आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही.”

त्यानंतर राखीने आदिलची गर्लफ्रेंड तनूवर टीका करत म्हणाली, “माझ्या पतीला किती दिवस स्वतःजवळ ठेवशील. किती दिवस तू त्याच्याबरोबर राहशील ?” राखीच्या आईचे निधन झाल्यानंतर आदील राखी सोबत राहत नाही. सध्या तो त्याची गर्लफ्रेंड तनू सोबत राहत आहे. सध्या सर्वत्र नेमकी ही तनू कोण आहे याची चर्चा झाली.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. पण त्या दोघांनीही लग्न गेल्या वर्षी जुन- जुलै दरम्यान केली असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. सोबतच त्या नंतर ही त्यांचे लग्न धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आता राखी- आदिलचा संसार मोडणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: त्वचेला बेसन लावल्यानंतर चुकूनही या गोष्टी लावू नका, नाहीतर...

Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Red Chilli Chutney Recipe: झणझणीत लाल मिरची चटणी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT