Netizens Slam Akshay Kumar: अक्षय कुमार की कॅनेडियन कुमार? नेटकऱ्यांचा संतप्त सवाल

अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Akshay Kumar Get Slam On Social Media
Akshay Kumar Get Slam On Social Media Saam TV
Published On

Akshay Kumar Gets Trolled On Social Media: अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. अक्षय अनेक कलाकारांसह रील बनवून शेअर करत होता. यामुळे नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. परंतु अक्षय कुमारने एक विडिओ शेअर करताच तो नेटकऱ्यांच्या निशाणावर आला आहे.

लक्ष्य कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केले आहे. या व्हिडिओमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसह दिशा पटानी, मौनी रॉय, सोनम बजावा, नोरा फतेही सुद्धा दिसत आहेत.

अक्षय कुमारासह या अभिनेत्री जगाच्या नकाशावर चालत आहेत. तर अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अक्षयचा पाय भारताच्या नकाशावर आहे. यामुळे अक्षय ट्रोलर्सच्या निशाणावर आला आहे.

Akshay Kumar Get Slam On Social Media
Pathan Movie 12th Day Collection: १२व्या दिवशी शाहरुखच्या 'पठान'चा गाजावाजा, न भूतो न भविष्यति असे आहे चित्रपटाचे कलेक्शन

अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'द एंटरटेनर्स १०० टक्के शुद्ध देशी एंटरटेनमेंट नॉर्थ अमेरिकेला जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही सीट बेल्ट बांधून घ्या, आम्ही मार्चमध्ये येत आहोत.' एंटरटेनर्स अक्षय कुमार इंटरनॅशनल टूरचे नाव आहे.

अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. नेटकरी कमेंट करत आहेत की, 'कॅनडाचा अभिनेता भारताच्या नखावर चालत आहे. हा भारतीयांचा अपमान आहे. तुला १५० करोड भारतीय या लाजिरवाण्या कृत्यासाठी कधी माफ करणार नाहीत.' तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे, भाई जरा तरी आदर करा, आमच्या भारत देशाचा.'

तू कॅनेडियन आहेस, तू कॅनडाला जा, असे नेटकरी अक्षयला सांगत आहेत. तू कश्या कुमार नाही कॅनेडियन कुमार आहेस, असे नेटकरी म्हणत आहेत.

अक्षय कुमारचे नागरिकत्व कॅनडाचे आहे, त्यामुळे त्याच पासपोर्ट देखील तिथलाच आहे. तो भारतीय नागरिक नसल्याने अनेकदा अक्षय कुमार ट्रोल होत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com