Marathi Movie saam tv
मनोरंजन बातम्या

New Marathi Movie Release: सत्य आणि अन्यायाच्या संघर्षात कोण जिंकेल? ‘राख’ चा जबरदस्त ट्रेलर लाँच

New Marathi Movie Release: ‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे.

Saam TV News

मराठी ओटीटी विश्वात दमदार आणि प्रभावी कथा घेऊन येण्याचा अल्ट्रा झकासचा प्रयत्न सुरूच आहे. आता त्यांनी आणखी एक रोमांचक वेब सिरीज सादर करण्याची तयारी केली आहे – ‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे. तसेच ही वेब सिरीज २१ मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून, आज १७ मार्चला सोशल मीडियावर ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

अत्याधुनिक कथा, दमदार सादरीकरण!

सामाजिक अन्याय, राजकीय कटकारस्थानं आणि पोलिस दलातील संघर्ष यासारख्या विषयांवर आधारित ‘राख’ ही वेब सिरीज ७ भागांमध्ये प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. एका निडर पोलिस अधिकाऱ्याची सत्याच्या शोधात चाललेली धडपड, त्याला मिळणारे खरे-खोटे संकेत, आणि या संपूर्ण प्रवासात त्याच्याच भोवती विळखा घालणारी एक अंधारी आणि धक्कादायक दुनिया—हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक भाग नवीन रहस्य उलगडत जाईल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

दिग्दर्शक आणि कलाकारांची जबरदस्त जोडी

या वेब सिरीजचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केलं असून, त्यांच्या दिग्दर्शनशैलीत वास्तववाद, सस्पेन्स आणि थरार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच निर्मितीची जबाबदारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी देखील समर्थपणे सांभाळली आहे, ज्यांनी अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक दर्जेदार प्रकल्प साकारले आहेत.

कलाकारांचा तगडा संचही ‘राख’ चं मोठं आकर्षण आहे. यात अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दस्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण आणि कृष्ण रघुवंशी यांसारखे ताकदीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ही वेब सिरीज आणखी उत्कंठावर्धक ठरणार आहे.

थरारक कथा, उत्कंठा वाढवणारा अनुभव!

‘राख’ ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर ती सत्य आणि न्यायासाठी झगडणाऱ्या माणसाची कहाणी आहे. इन्स्पेक्टर अभय अरविंद जाधव हा एक निडर आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी दाखवला आहे, जो कोणत्याही दबावाला झुकत नाही. परंतु, जेव्हा त्याच्या जवळच्या मित्राचा खून होतो, तेव्हा त्याची न्याय मिळवून देण्याची लढाई आणखी तीव्र होते.

या गुन्ह्यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होत जाते, आणि सत्याच्या शोधात अभयला मोठ्या राजकीय व गुन्हेगारी शक्तींशी सामना करावा लागतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे का? भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या निडर माणसाचं आयुष्य किती कठीण असतं? आणि, खरंच न्याय मिळतो का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट- सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?

Monsoon Trekking Spot : पावसाळा संपण्याआधी करा ट्रेकिंगचा प्लान, 'हे' ठरेल बेस्ट लोकेशन

Thursday Astro Remedies: घरात येईल सुख-शांती; गुरुवारच्या दिवशी हे खास उपाय नक्की करा

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Ashish Kapoor Arrested : मोठी बातमी! पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT