raju srivastava critical Know About his Health condition Saam TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava critical| राजू श्रीवास्तवची प्रकृती पुन्हा बिघडली; मेंदूला सूज आणि पाणीही

राजू श्रीवास्तव सध्या एम्स रुग्णालयात असून, तो अद्याप शुद्धीवर आलेला नाही. त्यातच आता त्याच्या प्रकृतीसंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.

साम ब्युरो

Raju Srivastava Health Condition | नवी दिल्ली: कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीसंबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव याची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर राजू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे काल सांगण्यात येत होते. मात्र, आता त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) १० ऑगस्ट रोजी जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना खाली कोसळला होता. त्याला तात्काळ एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून राजू हा बेशुद्धावस्थेत आहे. तो शुद्धीवर येण्यास अजून आठवडाभराचा कालावधी लागेल, असं सांगण्यात येत होतं. पण आज, गुरुवारी राजूच्या प्रकृतीसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या मेंदूत (Brain) पाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या मेंदूला सूजही आली आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तवची प्रकृती पुन्हा बिघडली असून, ती चिंताजनक आहे. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजूची प्रकृती सुधारत असून, शुद्धीवर येण्यासाठी आठवडा लागू शकतो, असे कालपर्यंत सांगण्यात येत होते. त्याच्या शरीराच्या हालचाली काही प्रमाणात वाढल्याचेही निकटवर्तीयांकडून सांगितले जात होते. इतकेच नाही तर, व्हेंटिलेटर काढण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. दुसरीकडे, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि चाहते प्रार्थना करत आहेत.

शेखर सुमन म्हणाला...

अभिनेता आणि कॉमेडियन शेखर सुमन हा देखील राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. त्याने अलीकडेच राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. १५ दिवसांपूर्वीच त्याची आणि राजूची भेट झाली होती. राजू हा इंडियाज लाफ्टर चॅम्पियनच्या सेटवर आला होता. त्यावेळी राजू श्रीवास्तवची प्रकृती काही प्रमाणात खालावल्याचे दिसत होते. त्यावेळी शेखर सुमनने त्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Mumbai Local: नवी मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू, तोल गेला अन् रूळावर पडला

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

SCROLL FOR NEXT