Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Maalik-Aankhon Ki Gustaakhiyan Collection : राजकुमार राव की विक्रांत मेस्सी, तिकीट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Maalik-Aankhon Ki Gustaakhiyan Box Office Collection Day 4 : सध्या बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावचा 'मालिक' आणि विक्रांत मेस्सीचा 'आँखों की गुस्ताखियाँ' हे चित्रपट पाहायला मिळत आहे. यांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावचा (Rajkummar Rao) 'मालिक' आणि विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 'आँखों की गुस्ताखियाँ' हे चित्रपट एकमेकांना टक्कर देत आहेत. हे दोन्ही चित्रपट रिलीज होऊन 4 दिवस झाले आहेत. 'मालिक' आणि 'आँखों की गुस्ताखियाँ' (Aankhon Ki Gustaakhiyan) हे दोन्ही सिनेमे 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही चित्रपटाच्या कलेक्शमध्ये संथ सुरुवात झाली आहे. आता चार दिवसांत कोणी कितीचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'मालिक' चित्रपट

'मालिक' चित्रपटात राजकुमार रावसोबत मानुषी छिल्लर, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अंशुमन पुष्कर आणि स्वानंद किरकिरे हे कलाकार झळकले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. 'मालिक' चित्रपटाचे बजेट 54 कोटी रुपये आहे. 'मालिक' (Maalik) हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. राजकुमार चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत झळकला आहे.

'मालिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • दिवस पहिला - 3.75 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 5.25 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 5.25 कोटी रुपये

  • दिवस चौथा - 1.65 कोटी रुपये

  • एकूण - 15.90 कोटी रुपये

'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपट

'आँखों की गुस्ताखियाँ' ही एक प्रेमकथा आहे. यात मुख्य भूमिकेत विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर ही जोडी पाहायला मिळत आहे. चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष सिंग आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे बजेट 20 कोटी रुपये आहे.

'आँखों की गुस्ताखियाँ' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • दिवस पहिला - 30 लाख

  • दिवस दुसरा - 49 लाख

  • दिवस तिसरा - 41 लाख

  • दिवस चौथा - 20 लाख

  • एकूण - 1.35 कोटी रुपये

बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये राजकुमार रावच्या 'मालिक' चित्रपटाने विक्रांत मेस्सीच्या 'आँखों की गुस्ताखियाँ' मागे टाकले आहे. 'मालिक'चे कलेक्शन झपाट्याने वाढताना दिसत आहे. तर 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपटाच्या कलेक्शमध्ये घट होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT