Rajkummar rao, Saam Tv
मनोरंजन बातम्या

एका मुलीच्या प्रेमात राजकुमार रावने केलं असं काही... ऐकून धक्काच बसेल!

राजकुमार रावला मुलीवरील प्रेमप्रकरणामुळं २५ जणांकडून मारहाण झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao) बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक. रूपेरी पडद्यावर दमदार अभिनयाने त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. एखादं पात्र साकारताना ते रूपेरी पडद्यावर जिवंत करणारा अभिनेता राजकुमार रावचा आज ३१ ऑगस्टला ३८ वा वाढदिवस (Birthday) आहे. अभिनयानं यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या राजकुमार रावबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. ती वाचून यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्च वाटेल की राजकुमार रावला मुलीवरील प्रेमप्रकरणामुळं २५ जणांकडून मारहाण झाली होती.

राजकुमार राव याचा ३१ ऑगस्ट १९८४ रोजी हरियणातील गुरुग्राममध्ये येथे जन्म झाला. त्याने गुरुग्रामच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतले. राजकुमारला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अथक मेहनतीनंतर राजकुमार राव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या या मेहनतीचे आणि उत्तम अभिनयाचे फळ म्हणजे आज बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये त्याची गणना केली जाते.

राजकुमार रावने गेल्या वर्षी त्याची दीर्घकाळची मैत्रीण आणि अभिनेत्री पत्रलेखाशी लग्न केले. पत्रलेखाने २०१४ मध्ये राजकुमार राव याच्यासोबत 'सिटी लाइट्स' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला पत्रलेखाला राजकुमार एक विचित्र मुलगा असल्याचे वाटत होते. मात्र, नंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांची मैत्री झाली आणि मग डेटिंग सुरू झाले आणि ११ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. पण राजकुमारची ही एकमेव प्रेमकथा नाही. याआधीही त्याचे अनेक मुलींवर प्रेम जडले होते. त्यासाठी त्याने मार देखील खाल्ला आहे.

राजकुमार राव याने एकदा त्याच्या बालपणीच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. 'मी गुरुग्राममधील स्कूलमध्ये शिक्षणासाठी गेलो होतो. त्याच शाळेत मी एका मुलीला बास्केटबॉल खेळताना पाहिलं. काही दिवसांनतर आमची मैत्री झाली आणि मग डेटिंगला सुरूवात झाली. पण त्या मुलीचा आधीच एक बॉयफ्रेंड होता. जेव्हा त्या मुलीच्या प्रियकराला समजले की मी डेट करत आहे, तेव्हा तो मला मारण्यासाठी त्या मुलांसोबत आला. २५ मुलांनी मिळून मला खूप मारलं,' असे त्याने सांगितले होते.

राजकुमार रावने २०१० मध्ये रन या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केले आहे. राजकुमारने 'शहीद', 'काय पो छे' ,'सिटीलाइट्स', 'अलीगढ', 'न्यूटन' आणि स्री या चित्रपटांतील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. येत्या काही दिवसांत राजकुमार बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT