Coolie Cast Fees SAAM TV
मनोरंजन बातम्या

Coolie Cast Fees : रजनीकांत ते आमिर खान, 'कुली' चित्रपटासाठी कोणी किती घेतलं मानधन?

Coolie Movie: 'कुली'मध्ये मनोरंजनसृष्टीतील मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. चित्रपटासाठी आमिर खानने किती मानधन घेतले , जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कुली' चित्रपटामुळे साऊथ अभिनेते रजनीकांत चर्चेत आहेत.

'कुली' चित्रपटात आमिर खान देखील झळकणार आहे.

'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Bollywood News: सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या 'कुली' (Coolie ) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आगाऊ बुकिंगने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. चाहते खूप वेळानंतर रजनीकांतला मोठ्या पडद्यावर पाहणेसाठी उत्सुक आहे. लोकेश कनागराज हे 'कुली' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

'कुली' स्टारकास्ट

रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात रजनीकांत, आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'कुली' मध्ये रजनीकांत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रजनीकांत

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी 'कुली' चित्रपटासाठी तब्बल 200 कोटी रुपये मानधन घेतले आहे. सुरुवातीला त्यांना 150 कोटी रुपये फी मिळणार होती. मात्रॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरपूर कमाई झाल्यामुळे त्यांचे मानधन वाढवण्यात आले आहे.

आमिर खान

रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटात आमिर खानने एक छोटी भूमिका साकारणार आहे. त्याने चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

नागार्जुन अक्किनेनी

नागार्जुन अक्किनेनी यांनी 'कुली'साठी 10 कोटी रुपये फी घेतली आहे. चित्रपटात त्यांनी सायमनची भूमिका साकारली आहे.

श्रुती हसन

श्रुती हसनने चित्रपटासाठी 4 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

सत्यराज

'बाहुबली' फेम अभिनेता सत्यराज यांनी 'कुली' चित्रपटासाठी 5 कोटी रुपये फी घेतली आहे.

रजनीकांत चित्रपट

'कुली' नंतर रजनीकांत 'जेलर 2'मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट मीडिया रिपोर्टनुसार, 2025 च्या शेवटी किंवा 2026 मध्ये रिलीज होणार आहे. नेल्सन दिलीपकुमार हे 'कुली' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT