Coolie Trailer: बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर लिहिलेले असते की तो कोणाच्या हातून मरेल... रजनीकांतच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर या संवादाने सुरू होतो. रजनीकांत थरारक अॅक्शन, उत्तम म्यूझिक आणि जबरदस्त संवादांसह मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहेत. एकाच चित्रपटात ५ इंडस्ट्रीमधील दिग्गजांना पाहणे प्रेक्षकांसाठी एक अद्भुत अनुभव ठरणार आहे.
रजनीकांत, नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहीर आणि आमिर खान एकत्र दिसणार आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. तथापि, ३ मिनिटे ७ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शनने भरलेला असून यामधील सर्व कलाकारांचा लूकही समोर आला आहे. परंतु त्यांच्या पात्रांबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही.
५ इंडस्ट्रीजमधील कलाकारांचा समावेश
'कुली' हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे. करणार आहे. चित्रपटाचा प्लस पॉईंट म्हणजे त्याची स्टारकास्ट. ज्यामध्ये रजनीकांत (तामिळ), नागार्जुन (तेलुगू), उपेंद्र (कन्नड), सौबिन शाहीर (मल्याळम) आणि आमिर खान (हिंदी) हे सर्व वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधील कलाकार आहेत. श्रुती हासन देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.
लाखो व्ह्यूज
लोकेश कनागराजच्या जुन्या चित्रपटांनी अनेक लोकांची मने जिंकली आहेत, ज्यामुळे लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आमिर खानबद्दल बोलायचे झाले तर, तो ट्रेलरमध्ये खूप कमी काळ पडद्यावर दिसला, परंतु त्याचा लूक खूपच आश्चर्यकारक आहे. तसेच, रजनीकांतच्या व्यक्तिरेखेबद्दल खूप सस्पेन्स आहे. 'कुली' हा एक तमिळ चित्रपट आहे, परंतु तो तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित केला जाईल. या ट्रेलरला खूप कमी वेळात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.