Rajesh Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajesh Sharma: शूटिंगदरम्यान चावला विषारी किडा; प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मांची प्रकृती गंभीर, AICWA ने केली चौकशीची मागणी

Rajesh Sharma: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Rajesh Sharma: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अपघातानंतर अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) नेही चिंता व्यक्त करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सेटवर नक्की काय घडले?

सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून राजेशसोबत घडलेल्या घटनेचा तपशील दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रामोजी फिल्म सिटीमधील एका दाट झाडी असलेल्या भागात घडली, जिथे राजेश स्थानिक तंत्रज्ञांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना जाणवले की त्यांच्या पायाला कशानेतरी चावलं आहे. सुरुवातीला त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि आपले शूटिंग पूर्ण केले. मात्र, सहा तासांनंतर त्यांच्या उजव्या पायात वेदना सुरू झाल्या. असे असूनही, त्यांनी कोलकाताला जाण्यासाठी विमान पकडले. विमानात असताना त्यांना ताप भरला आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे, कोलकाताला पोहोचताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टर काय म्हणतात?

डॉक्टरांच्या मते, किडा चावल्यामुळे पसरलेल्या विषामुळे अभिनेत्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंतचा भाग प्रभावित झाला असून, तिथे मोठे फोड आले आहेत. याव्यतिरिक्त, अभिनेत्याला श्वास घेण्यासही त्रास होत आहे.

हैदराबादमधील रुग्णालयात का दाखल केले नाही

या दुर्दैवी घटनेमुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरक्षिततेच्या मानकांबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'चे (AICWA) अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित निर्मिती संस्थेला (प्रॉडक्शन हाऊस) जाब विचारला आहे. सेटवर अभिनेत्याची प्रकृती खालावू लागली असताना त्याला हैदराबादमधील एखाद्या मोठ्या रुग्णालयात त्वरित का दाखल केले नाही आणि त्या अवस्थेत त्याला प्रवास करण्याची परवानगी कशी दिली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Karna Mahabharata: महाभारतात कर्णाला कोणकोणते शाप मिळाले होते?

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT