Shreya Maskar
सीताबर्डी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नागपूरमधील सीताबर्डी येथील माढा कॉलनी येथे वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.
नागपूरमधील सीताबर्डी किल्ला हा प्रामुख्याने १८१७ मध्ये झालेल्या ऐतिहासिक 'सीताबर्डीच्या लढाई'साठी आणि एक सक्रिय लष्करी तळ म्हणून बजावलेल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
सीताबर्डी किल्ल्यावर १८१७ मध्ये निर्णायक अशी 'सीताबर्डीची लढाई' झाली होती आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशीही या किल्ल्याचा संबंध आहे.
सीताबर्डी किल्ला ही दोन टेकड्यांवर वसलेली एक ऐतिहासिक तटबंदी आहे. एका जोड-कड्याने (सॅडल रिज) जोडलेली, असमान आकाराची दुहेरी-शिखर असलेली रचना आहे.
सीताबर्डी किल्ला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्ट्र दिन यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय सणांच्या दिवशीच सामान्य जनतेसाठी खुला केला जातो.
नागपूरमधील सीताबर्डी किल्ला १८१७ मधील सीताबर्डीच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता.
मुंबईहून ट्रेनने प्रवास करून नागपूर जंक्शनला जाल. त्यानंतर स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.