Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील महत्वाच्या मसाल्यांपैकी एक म्हणजे दालचिनी मसाला. दालचिनी मसाला अत्यंत गुणकारी मानला जातो. हा मसाला केवळ जेवणाची चव आणि सुवास वाढवत नाही, तर औषधी गुणधर्मांमुळे देखील फायदेशीर मानला जातो.
डायबिटीजच्या रूग्णांना दालचिनीचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र खरंच डायबिटीजचे रूग्ण दालचिनीचा चहा पिऊ शकतात का? दालचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
दालचिनीमध्ये 'सिनामॅल्डिहाइड' नावाचा विशेष घटक असतो. हा घटक शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
दालचिनीचे सेवन केल्याने शरीरात ग्लुकोज शोषण्याची प्रक्रिया मंदावते, परिणामी जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील ताण कमी करून अंतर्गत अवयव निरोगी ठेवतात.
दालचिनीचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दालचिनीचा चहा बनवण्यासाठी दालचिनी आले किंवा तुळशीची पाने हे साहित्य एकत्र घ्या.
दालचिनीचा चहा बनवण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात दालचिनीचा तुकडा घालून पाणी उकळून घ्या म्हणजे दालचिनीचे सर्व घटक पाण्यात मिसळतील.
चहा तयार झाल्यानंतर तुम्ही गाळून एका कपमध्ये ओतून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.