Manasvi Choudhary
स्वयंपाक करताना चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यासाठी सुरक्षित तेल निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण आजकाल बाजारात विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. पण अनेक महिलांना स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे असा प्रश्न पडतो.
मोहरीचे तेल की सूर्यफूल तेल आरोग्याच्या दृष्टीने या दोघांपैकी कोणते तेल फायदेशीर आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी तेलातील फॅटी अॅसिड्स ओमेगा-६ आणि ओमेगा-३ चे संतुलन अत्यंत महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे मोहरी आणि सूर्यफूल तेलाचे गुणधर्म जाणून घ्या.
मोहरीचे तेलामध्ये 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स' असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
मोहरीच्या तेलामध्ये नैसर्गिकरीत्या ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
मोहरीच्या तेलाचा वापर तुम्ही तळण्याचे पदार्थ किंवा फोडणीसाठी करू शकता.
सूर्यफूल तेलामध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
सूर्यफुलाचे तेल पचायला हलके असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
तिखट भाज्या आणि तळायचे पदार्थ बनवायचे असतील, तर मोहरीचे तेल तुम्ही वापरू शकता.
जर तुम्हाला फॅट्स कमी करायचे असेल आणि हलके फुलके पदार्थ बनवायचे असतील तर तुम्ही सूर्यफूल तेल वापरा. .
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.