Raja Shivaji box office collection day 5 google
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा धुमाकूळ, ५व्या दिवशी इतके कोटी कमावले

Raja Shivaji Box Office Collection Day 5: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पाचव्या दिवशीही दमदार कामगिरी करत ३.३५ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

Sakshi Sunil Jadhav

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथेवर आधारित चित्रपट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तयार केले गेले. मात्र अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी'हा चित्रपट प्रचंड गाजतोय. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि फक्त ५ व्या दिवसातच त्याने बॉक्स ऑफीसवर राज्य केलं. या चित्रपटाचे बजेट हे १०० कोटींचे होते. ज्यात अनेक मराठी आणि बॉलिवूडच्या कलाकारांचा समावेश आहे.

जेनेलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सलमान खान, भाग्यश्री यांच्यासह इतर कलाकारांचा या चित्रपटात सहभाग आहे. मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' हा चित्रपट जिओ स्टुडिओने प्रस्तुत केला आहे. तर याची निर्मिती ही ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी केली आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाने ३३ कोटींहून जास्त रुपयांची कमाई ही पहिल्याच दिवशी केली. आता आपण पाचव्या दिवसाची कमाई जाणून घेणार आहे.

राजा शिवाजी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५

SaccNilc ने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने मंगळवारी ५,४८५ शोजमधून ४.९० कोटींची कमाई केली. भारतातले याचे कलेक्शन आता ४४.४० कोटी आहे. तर एकूण केलेक्शन ५२.६८ कोटी इतके झाले आहे.

मराठी आवृत्ती कलेक्शन

पहिल्या दिवसाचे कलेक्शन : ८ कोटी रुपये

दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन : ७.१५ कोटी रुपये

तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन : ७.७५ कोटी रुपये

चौथ्या दिवसाचे कलेक्शन : ४. २५ कोटी रुपये

पाचव्या दिवसाचे कलेक्शन : ३. ३३५ कोटी रुपये

एकूण कमाई : ३०.५ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT