आज (१४ डिसेंबर १९२४) दिवंगत बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांचा वाढदिवस. बॉलिवूडचे ‘शो मॅन’ म्हणून राज कपूर यांची चाहत्यांमध्ये ओळख आहे. आज भलेही राज कपूर आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या माध्यमातून ते आज करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. राज कपूर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आजपासून तीन दिवस त्यांच्या खास गोष्टींचा अर्थात ऑटोग्राफ, त्यांचे फोटो, फिल्म पोस्टर्स सह इ गोष्टींचा लिलाव करण्यात येणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एक उत्तम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांची ओळख आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, Derivatives & Ives या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्या तब्बल ५१ गोष्टींचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव १४ ते १६ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो, कलरफूल फोटो, शोकार्ड, लॉबी कार्ड, चित्रपटांचे पोस्टर्स, त्यांचे ऑटोग्राफसह अनेक वस्तूंचा ऑनलाईन लिलाव होणार आहे.
Derivatives & Ives या वेबसाईटने ‘सेलिब्रिटिंग द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर १००’ या नावाने ऑनलाईन लिलावाची घोषणा केली आहे. हा लिलाव Derivatives & Ives या वेबसाईटच्या माध्यमातून होणार आहे. संगम, तिसरी कसम, मेरा नाम जोकर या चित्रपटाचे फोटोग्राफिक स्टिल्स, प्रोमोशनल बुकलेट्स चाहत्यांना खरेदी करता येणार आहे. यावेळी कपूर कुटुंबीयांच्या फोटोंच्या पोस्टर्सचाही लिलाव करण्यात येणार आहे. राज कपूर यांचे नर्गिस, वैजयंतीमाला, मधुबाला इत्यादी आघाडीच्या अभिनेत्रींसोबतची अनेक न पाहिलेले फोटोज ही या लिलावामध्ये चाहत्यांना मिळणार आहेत. (Bollywood News)
राज कपूर यांचे खरे नाव, सृष्टीनाथ कपूर असे आहे. वयाच्या ११व्या वर्षी राज कपूर यांनी ‘इन्कलाब’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. राज यांनी वयाच्या २४व्या वर्षी ‘आग’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. बॉलिवूडमधील सर्वात तरुण चित्रपट दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांची ओळख आहे. तर, १९४८मध्ये राज यांनी आरके फिल्म्स नावाच्या फिल्म स्टुडिओची स्थापन केली. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.