Raj Kapoor Bungalow SOLD: आर के स्टुडिओनंतर आता राज कपूरचा बंगला ही विकला, वाचा सविस्तर...

राज कपूर यांनी 1948 मध्ये आरके स्टुडिओची स्थापना केली.
Raj Kapoor's Bungalow Sold
Raj Kapoor's Bungalow Sold Saam Tv

Raj Kapoor Bungalow Sold To Godrej: दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे ऐतिहासिक मालमत्ता विकण्यात आली आहे. आर के स्टुडिओनंतर आता त्यांच्या चेंबूर येथील बंगला देखील विकला गेला आहे. हा बंगला देखील गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला आहे. याला बंगल्याला एके रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये बदलण्यात येणार आहे.

राज कपूर यांचा हा बंगला देवनार फार्म रॉडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अगदी बाजूला आहे. चेंबूरच्या सर्वात महागड्या परिसरात हा बंगला असल्याचे म्हटले जाते. हा बंगला राज कपूर यांच्या कुटुंबाकडून विकत घेण्यात आला असून त्यावर प्रीमियम निवासी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Raj Kapoor's Bungalow Sold
Disney+ Hotstar Down: गेल्या तासभरापासून हॉटस्टारचे सर्व्हर डाऊन

हा बंगला कितीला विकण्यात आला हे उघड करण्यात आलेले नाही. परंतु मनीकंट्रोल अहवालात नमूद केले आहे की, Zapkey.com द्वारे याची माहिती काढली असता या मालमत्तेची नोंदणी कागदपत्रे 100 कोटी रुपयांची आहेत.

यापूर्वी, गोदरेज प्रॉपर्टीजने मे 2019 मध्ये राज कपूर यांचा आरके स्टुडिओ विकत घेतला होता. गोदरेज आरकेएसचा एकत्रित प्रकल्पही तेथे विकसित केला जात आहे. तो प्रकल्प या वर्षापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दिवंगत राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांनी सांगितले की “आमच्याकडे या बंगल्याशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत आणि आमच्या कुटुंबासाठी हा बंगला खूप महत्त्वाचे आहे. गोदरेज कंपनीसह हा समृद्ध वारसा पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

यापूर्वी, राज कपूर यांची आठवण असलेला ७० वर्षीय जुना आरके स्टुडिओ देखील गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केला होता. मुंबईतील चेंबूर परिसरात २.२ एकरमध्ये पसरलेला आरके स्टुडिओ रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्या मालकीचा होता. आरके स्टुडिओमध्ये 33,000 चौरस मीटर परिसरात आधुनिक निवासी अपार्टमेंट आणि लक्झरी रिटेल स्पेस बनविण्यात येत आहे.

गोदरेज प्रॉपर्टीज ही गोदरेज समूहाची उपकंपनी आहे. राज कपूर यांनी 1948 मध्ये आरके स्टुडिओची स्थापना केली. तेथे होळी आणि गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यायचे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या वेळी उपस्थित राहत असत. 2017 मध्ये आरके स्टुडिओचा मोठा भाग आगीत भस्मसात झाला होता. यानंतर कपूर कुटुंबाने तो स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com