Raj Babbar In The Kapil Sharma Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Babbar: ‘माझी अवस्था म्हणजे ना घरका, ना घाटका...’; स्मिता पाटीलचे पती राज बब्बर जरा स्पष्टच म्हणाले...

लिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते राज बब्बर यांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी आपल्या अभिनयापासून ते राजकारणातील कारकिर्दीपर्यंत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

Chetan Bodke

Raj Babbar In The Kapil Sharma Show: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते राज बब्बर सध्या आपल्या ‘हॅप्पी फॅमिली- कंडिशन्स अप्लाय’ या त्यांच्या शोमुळे बरेच चर्चेत आहेत. राज बब्बर नुकतेच आपल्या मुलांसोबत अर्थात प्रतीक बब्बर, आर्य बब्बर आणि जुही बब्बर यांच्यासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या अभिनयापासून ते राजकारणातील कारकिर्दीपर्यंत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

सोनी टिव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, होस्ट कपिल शर्मा राज बब्बरला काही मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहेत. कपिल शर्मा विचारतो, सर, तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की, निर्मात्याने तुमचे पेमेंट थांबवले आहे, पण तुमचा राजकारणातील प्रवास सुरु झाल्यावर तुमचे पैसे द्यायला पोहोचला आहे? या प्रश्नावर उत्तर देत, राज बब्बर म्हणतात, ‘जेव्हा मी राजकीय जीवनात प्रवेश केला तेव्हा लोकांनी मला पैसे देणे ही बंद केले, त्यांना वाटले की राज बब्बर यांना आता पैशांची कसली गरज आहे?’

राज बब्बर कार्यक्रमात म्हणतात, ‘अनेक लोकांची खूप चुकीची धारणा आहे की, राजकारणात एकदा तुम्ही गेलात की कोट्याधीश बनतात.' यानंतर आमचे काय झाले? माझी अवस्था म्हणजे ना घरका, ना घाटका... सारखी झाली असून मला, राजकारणातून ही काही मिळाले नाही आणि मनोरंजनसृष्टीतूनही काहीही मिळाले नाही.’ असे म्हणत त्यांनी आपली फजिती सांगितली.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, ‘आज रात्री ९: ३० वा. सोनी टेलिव्हिजनवर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कपिलच्या प्रश्नांवर राज बब्बर यांचे सणसणीत उत्तरं.’

राज बब्बर यांच्या बद्दल बोलायचे तर, हे काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ‘हॅप्पी फॅमिली- कंडिशन्स अप्लाय’ या कॉमेडी शोद्वारे त्याने अलीकडेच ओटीटीवर पदार्पण केले आहे. यामध्ये अतुल कुलकर्णी, रत्ना पाठक शाह आणि आयेशा जुल्का हे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Period Leave: नोरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT