Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office:'रेड 2'चा पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका; सोमवारी केली इतक्या कोटींची कमाई

Raid 2 Box Office Day 5: अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून, पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाच्या सादरीकरण आणि अभिनय उत्तम आहे.

Shruti Vilas Kadam

Raid 2 Box Office Day 5: अजय देवगन आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये असलेला 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाला असून, पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाने सोमवारच्या (5 मे) दिवशी 7.75 कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण कमाई 78.75 कोटी रुपयांवर पोहोचली आहे .

'रेड 2' मध्ये अजय देवगनने आयकर विभागातील अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारली आहे, तर रितेश देशमुखने भ्रष्ट राजकारणी दादा भाईच्या भूमिकेत आहे. तर, वाणी कपूर अमय पटनायकच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या दोघांमधील संघर्ष आणि चित्रपटाचे सादरीकरणामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होत आहे.

चित्रपटाच्या कमाईचा आढावा घेतल्यास, पहिल्या दिवशी 19.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 12 कोटी, तिसऱ्या दिवशी 18 कोटी, चौथ्या दिवशी 22 कोटी आणि पाचव्या दिवशी 7.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या आकड्यांवरून चित्रपटाची लोकप्रियता आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येतो.

'रेड 2' ची कथा 2018 मध्ये आलेल्या 'रेड' चित्रपटाच्या पुढील घटनांवर आधारित आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगन, रितेश देशमुख, वाणी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. चित्रपटाच्या यशामुळे निर्माते आणि कलाकार आनंदी असून, आगामी दिवसांतही 'रेड 2' च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT