Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection: 'रेड 2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 13व्या दिवशीही अजय देवगनच्या चित्रपटाची कमाई जोमात

Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगन, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रेड 2' या चित्रपटाने रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे.

Shruti Kadam

Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगन, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रेड 2' या चित्रपटाने रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ दोन आठवड्यांतच 130 कोटींच्या जवळपास कमाई करत, 'सिंघम अगेन' आणि 'शैतान' यांसारख्या हिट चित्रपटांनाही मागे टाकले आहे . तर, दुसऱ्या मंगळवारी रेड २ ने ३.७६ कोटींची कमाई केली आहे.

'रेड 2' हा 2018 मध्ये आलेल्या 'रेड' या चित्रपटाची सिक्वेल आहे. या चित्रपटात अजय देवगनने आयकर विभाग अधिकारी अमय पटनायकची भूमिका पुन्हा साकारली असून, रितेश देशमुखने भ्रष्ट राजकारणी 'दादा मनोहर भाई' ची भूमिकासाकारली आहे. चित्रपटाची कथा, अभिनय आणि दिग्दर्शन यांना प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, संगीत अमित त्रिवेदी, यो यो हनी सिंग, रोचक कोहली आणि सचेत-परंपरा यांनी दिले आहे. 'नशा' आणि 'मनी मनी' यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. तमन्ना भाटिया आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या डान्समुळे चित्रपटात रंगत आणली आहे .

'रेड 2' ने आतापर्यंत 174.34 कोटींची जागतिक कमाई केली असून, 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे . चित्रपटाच्या यशामुळे निर्माते 'रेड 3' च्या तयारीत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT