Rahul Vaidya on Virat Kohli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya on Virat Kohli: विराटवर कमेंट करणं राहुल वैद्यला पडलं महागात; म्हणाला, कोहलीचे फॅन्स...

Rahul Vaidya VS Virat Kohli: क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील सोशल मीडिया वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या वादाची सुरुवात विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका पोस्टला 'लाइक' केल्याने झाली.

Shruti Vilas Kadam

Rahul Vaidya VS Virat Kohli: क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील सोशल मीडिया वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या वादाची सुरुवात विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका पोस्टला 'लाइक' केल्याने झाली. या घटनेनंतर विराटने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे 'लाइक' इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे चुकून झाले आहे. या स्पष्टीकरणावर राहुल वैद्यने एक व्हिडिओ शेअर करून विराटवर टीका केली आणि त्याच्या चाहत्यांना 'जोकर' असे संबोधले.

राहुलने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, "आजपासून असे होऊ शकते की अल्गोरिदम माझ्या वतीने अनेक फोटो 'लाइक' करेल, जे मी केलेले नाहीत. त्यामुळे कोणतीही मुलगी कृपया यावर पीआर करू नका, कारण ही माझी चूक नाही, ही इंस्टाग्रामची चूक आहे." यानंतर त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर करून म्हटले की, "विराट कोहलीने मला ब्लॉक केले आहे, हेही कदाचित इंस्टाग्रामची गडबड असेल. इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमने विराटला सांगितले असेल की, 'मी तुझ्या वतीने राहुल वैद्यला ब्लॉक करतो.'"

या व्हिडिओनंतर विराटच्या चाहत्यांनी राहुलवर सोशल मीडियावर टीका केली. राहुलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षा मोठे जोकर आहेत!" त्याने पुढे लिहिले की, "आता तुम्ही मला शिव्या देता, ते ठीक आहे, पण माझ्या पत्नीला, माझ्या बहिणीला शिव्या देता, ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी बरोबर होतो. म्हणूनच तुम्ही सर्व विराट कोहलीचे चाहते जोकर आहात, 2 कौडीचे जोकर."

या वादानंतर राहुलने स्पष्ट केले की, तो विराटचा क्रिकेटर म्हणून चाहता आहे, पण माणूस म्हणून त्याचे समर्थन करत नाही. त्याने सांगितले की, "विराट कोहलीने मला काही कारणास्तव ब्लॉक केले आहे. मला आजही कारण समजलेले नाही. मी त्याचा चाहता होतो आणि क्रिकेटर म्हणून असेनच, पण माणूस म्हणून नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

'लाडकी'योजनेत मोठा स्कॅम, १२४३१ लाडक्या भावांची घुसखोरी, वर्षभर घेतले ₹१५००

SCROLL FOR NEXT