Rahul Gandhi Had Asked A Question About Shahrukh Politics Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Gandhi And SRK Viral Video: जेव्हा शाहरुख खानने थेट राहुल गांधींना दिलेला राजकारणाचा सल्ला, म्हणाला.. आपला देश तुम्ही... Video Viral

राहुल गांधींनी शाहरुखला, जर तुम्हाला देशातील राजकारण्यांना कोणता महत्वाचा सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही तो सल्ला काय द्याल? असा सवाल एकदा विचारला होता.

Chetan Bodke

Rahul Gandhi Had Asked A Question About Shahrukh Politics: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. मोदी समाजाची बदनामी केल्या प्रकरणी त्यांना जामीन मिळाला असताना दुसरीकडे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. अशातच, सोशल मीडियावर राहूल गांधींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मंचावर उभा आहे, राहुल गांधी तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि अन्य काही नेते समोर बसले आहेत.

यादरम्यान राहुल गांधी शाहरुखला विचारतात की, जर तुम्हाला देशातील राजकारण्यांना कोणता सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही तो सल्ला काय द्याल? यावर शाहरुख आधी हसतो, पण नंतर आपल्या खास शैलीत तो राजकारण्यांना 'सत्याचा सामना' करायला लावतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, राहुल गांधी स्टेजवर उभा असणाऱ्या शाहरुख खानला प्रश्न विचारतात, 'राजकारण्यांना तुला एक सल्ला द्यायचा आहे, तर तु तो सल्ला काय देशील?' यावर शाहरुख हसत हसत म्हणतो, ‘मला आनंद आहे की हा एक अतिशय सोपा प्रश्न आहे. एक सल्ला, ज्याचे सर्व राजकारणी पालन करतील आणि आपला देश विविध गोष्टींनी समृद्ध होईल.’ शाहरुख हसतो आणि राहुल गांधींना म्हणतो, ‘पहा हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला...’

राहुल गांधींना शाहरूख म्हणतो, तेव्हा शाहरुख म्हणतो, ‘मी एक अभिनेता आहे. माझे आयुष्य ऐशोआरामात जगायचे आहे, म्हणून मी रूपेरी पडद्यावर खोटं बोलतो. मी फसवतो आणि सर्वांना फसवत राहतो. हेच मी पडद्यावर दाखवत आहे. पण मी रियल लाईफमध्ये असा नाही.’ शाहरुखने हा टोमणा मारल्यावर समोर बसलेले सर्व राजकीय मंडळी पोट धरून हसतात.

शाहरूख पुढे म्हणतो, ‘जे देश चालवतात, सोबतच देशासाठी आणि नागरिकांसाठी निस्वार्थ सेवा देतात त्या राजकीय नेत्यांचा मला मनापासून आदर आहे.’ शाहरूख पुढे विनोदी शैलीत हसत हसत म्हणतो, ‘सर्वांना एक सल्ला म्हणून सांगतो, टेबलखालून पैसे घेऊ नका, चुकीच्या गोष्टी करू नका. जर आपण सर्वकाही व्यवस्थित केले तर आपण पैसे कमवू आणि आपण सर्व आनंदी होऊ. एवढेच नाही तर आपण सर्व मिळून एक महान आणि अभिमानास्पद राष्ट्र निर्माण करू.’

शाहरुखने असे म्हणताच उपस्थित असलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी टाळ्या वाजवल्या. 'म्हणून जर मला राजकारण्यांना एक सल्ला द्यायचा असेल तर मी म्हणेन की, कृपया शक्य तितके प्रामाणिक रहा.' शाहरुखच्या या व्हिडिओतील वाक्याचे सध्या सर्वत्र कौतुक होतंय. सोशल मीडियावर युजर्स कमेंट करत म्हणतात, ‘किंग खानला राजकीय मंडळींसोबत इतके हसत-हसत काय सांगायचे आहे बरं?' असं सवाल नेटकऱ्यांनी तिला सवाल उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात अंतरवली सराटीमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

Pune Crime: घायवळ प्रकरणानं वाढली सरकारची डोकेदुखी; गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच भाजप खासदारानं काढला पळ| Video Viral

SCROLL FOR NEXT