राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात Saam Tv
मनोरंजन बातम्या

राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

बिग बॉस 14’ Big Boss 14 फेम राहुल वैद्यने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राहुल वैद्य त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ‘बिग बॉस 14’ Big Boss 14 फेम राहुल वैद्यने Rahul Viadya आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राहुल वैद्य त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार Disha Parmar हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. राहुल वैद्य याने सोशल मीडियावर Social Media एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या बातमीनंतर राहुल आणि दिशा यांचे चाहते खूप आनंदित झाले आहेत. या दिवसाची त्यांचे सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. Rahul Disha's wedding date was fixed

16 जुलै रोजी राहुल आणि दिशा विवाहबंधनात Wedding अडकणार आहेत. राहुल याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने, हा खास क्षण तुमच्याबरोबर शेअर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. आम्ही 16 जुलै 2021 रोजी लग्नगाठ बांधणार आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक आहेत. आम्ही एकत्र एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ ही पोस्ट शेअर करत राहुल याने लिहिले की, #TheDisHulWedding

गायक राहुल वैद्य यांने नॅशनल टेलिव्हिजनवर National Television दिशा परमारला ‘बिग बॉस 14’च्या घरात, प्रपोज Propose केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि याचवेळी तिने राहुलला होकार दिला होता. दोघेही एकमेकांना बर्‍याच दिवसांपासून डेट Date करत होते. दिशाही राहुलच्या कुटुंबियांची खूप लाडकी आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT