भूषण अहिरे
धुळे: विधानसभेमध्ये आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर Mumbai-Agra highway नगाव परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. BJP workers block the Mumbai-Agra highway after the suspension of MLAs
विधानसभेमध्ये गैरकृत्य केल्याचा आरोप लावत अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे. याबाबत भाजपतर्फे ठाकरे सरकार Thackrey विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.
हे देखील पहा-
आपला संताप व्यक्त करण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील नागाव परिसरामध्ये ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत रास्तारोको केला. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचा आवाज दाबण्यासाठी सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप करीत महा विकास आघाडी सरकारचा निषेध तीव्र शब्दांमध्ये व्यक्त केला आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.