गोविंद साळुंके
शिर्डी: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत Shirdi सर्वत्र शुकशुकाट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून साई मंदिर Sai Mandir बंद आहे. भाविक शिर्डीत येत नसल्याने शिर्डीतील व्यवसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, फुल हार, फोटो, लोकिट प्रसादाचं साहित्य अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या दाणातही मोठी घट होत आहे. The Sai Temple has been closed for the last three months
शासनाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकान खुले करण्याचे आदेश दिले आहे. मात्र शिर्डीतील अर्थकारणच साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे. साईबाबाचं मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाही. त्यामुळे शिर्डीतील व्यवसाय टप्प झाले आहे.
वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत येत असतात. साई बाबांना भरभरून दाननही करत असतात. त्याच दानातून साई संस्थानचे रुग्णालय, भोजनालय, विविध सुख सुविधा दिल्या भाविकांना दिल्या जातात. गेल्यावर्षीही साई मंदिर आठ महिने बंद होते. आताही तीन महिन्यापासून साई मंदिर बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या दानातही मोठी घट होत आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.