या कारणासाठी शेतकऱ्याचा शोले स्टाईल आत्मदहनाचा इशारा.. (पहा व्हिडिओ)

गेल्या पाच तासांपासुन पुणे-रिंग रोड आणि पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला विरोध करत आहेत.
या कारणासाठी शेतकऱ्याचा शोले स्टाईल आत्मदहनाचा इशारा.. (पहा व्हिडिओ)
या कारणासाठी शेतकऱ्याचा शोले स्टाईल आत्मदहनाचा इशारा.. (पहा व्हिडिओ) रोहिदास गाडगे
Published On

रोहिदास गाडगे

पुणे : गेल्या पाच तासांपासुन पुणे-रिंग रोड आणि पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या जमिन संपादनाला विरोध करत राजगुरुनगर Rajguru Nagar येथील पाण्याच्या टाकीवर आत्मदहनाचा Self-immolation इशारा देत शेतकरी पाच तासांपासुन आंदोलन करत आहेत. Farmers Opposing land acquisition of Pune-Ring Road and Pune-Nashik railway project

व्हिडिओ-

पुणे नाशिक रेल्वे Pune Nashik Railway आणि पुणे रिंग रोड Pune Ring Road ला खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरा, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला आहे. खेड प्रांत कार्यालयासमोर गेली सात दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण"करूनही सरकाराला जाग येत नाही. रक्त सांडले तरी चालेल अशी आक्रमक भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी Farmer घेत आगामी आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा खेड तालुका रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यानी राजगुरूनगर येथे दिला. Farmers Opposing land acquisition of Pune Ring Road and Pune Nashik railway project

मात्र प्रांताधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाटीलबुवा गवारी यांच्या परिवाराने प्रशासनाला जाब विचारत आक्रमक पवित्रा घेत शासकिय पातळीवर सुरु असलेल्या हुकुमशाही विरोध घोषणाबाजी करण्यात येत आहे.

या कारणासाठी शेतकऱ्याचा शोले स्टाईल आत्मदहनाचा इशारा.. (पहा व्हिडिओ)
दोन मद्यधूंद व्यक्तींची भर चौकात आपआपसात फिल्मी स्टाईल हाणामारी

रिंग रोड व रेल्वे प्रकल्पांना जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन, अनेक अल्पभुधारक होणार आहेत. रेल्वे मार्गाचा स्थानिक विकासाला उपयोग होणार नाही. रिंग रोड बंदिस्त स्वरूपाचा असल्याने उर्वरीत तुकडे पडणा-या क्षेत्रातील जमिनी कसता येणार नाहीत. व्यवसायिक उपयोग होणार नाही. हा प्रकल्प शासनाने आमच्यावर लादू नये. अशा भावना शेतकऱ्यांच्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत शासन बळजबरीने भूसंपादन करीत आहे. याचा या गावातील शेतकरी तीव्र निषेध करीत असून शेतकरी आत्मदहन, आत्महत्या पाण्यात उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी बाधित शेतकरी करीत आहेत.

ज्ञानेश्वरी आणि गाथा चे पठण करुन सात दिवसांपासून आंदोलन सुरु होते. शेतक-यांच्या हक्कासाठी Rights सुरु असलेला लढा आता आक्रमक पवित्राने सुरु झाले आहे. दरम्यान पाटीलबुवा गवारी यांच्या दोन मुले पत्नी घटनास्थळी दाखल झाले आहेत...

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com