Raghav Juyal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

Raghav Juyal Viral Video : स्लो-मोशन किंग राघव जुयालचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो अभिनेत्रीला थोबाडीत मारताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राघव जुयाल आणि अभिनेत्री साक्षी मलिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राघव जुयाल व्हायरल व्हिडीओमध्ये साक्षीला मारताना दिसत आहे.

राघव जुयालने सोशल मीडियावर पोस्टकरून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

लोकप्रिय डान्सर , अभिनेता राघव जुयालचा (Raghav Juyal) एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यात राघव जुयाल एका अभिनेत्रीच्या थोबाडीत मारताना दिसत आहे. नेमकं व्हिडीओत काय, जाणून घेऊयात. राघव जुयालला स्लो-मोशन किंग म्हणून ओळखले जाते. त्याने होस्टिंग तसेच कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे.

ऑगस्टमध्ये राघव जुयाल आणि 'बॉम डिगी डिगी' या गाण्याची लोकप्रिय अभिनेत्री साक्षी मलिकचा एक भांडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये साक्षी राघवचे केस ओढताना दिसत असून राघव रागाच्या भरात साक्षीला थोबाडीत मारताना दिसतो. मध्येच अविनाश द्विवेदी आणि जय रंधावा त्यांच्यामध्ये येतात आणि भांडण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

राघव जुयाल -साक्षी मलिकच्या ( Sakshi Malik ) या व्हिडीओनंतर राघव जुयालला खूप ट्रोल करण्यात आले. त्यासाठी लोकांनी नाराजी व्यक्त केली. व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अखेर साक्षी मलिकने सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल व्हिडीओ मागचे खरे सत्य सांगितले.

साक्षी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हणाली, "मित्रांनो, हा फक्त एक सीन आहे. अभिनय सराव सत्रातील...येथे कोणालाही दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. फक्त चार कलाकार एका सादरीकरणावर काम करत होते. आशा आहे की तुम्ही समजून घ्या..." त्यानंतर स्वतः राघव जुयालने देखील पोस्ट करून याचा खुलासा केला. तो म्हणाला, "मित्रांनो, हा आमच्या नाटकाच्या कथेतील एक सीन होता. कृपया ते खरे मानू नका. फक्त एक चांगला अभिनेता बनण्यासाठी सराव करत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेतो बोलल्यानंतर हा बाप फिरकलाच नाही; नाशिकमधून राज ठाकरे फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

SCROLL FOR NEXT