R Madhavan Wanted To Marry Juhi Chawla Saam Tv
मनोरंजन बातम्या

R Madhavan News: ‘जुही चावलासोबत लग्न करणं माझं ध्येय होतं’; आर. माधवनने आईला सांगितली मनातली गोष्ट

R Madhavan And Juhi Chawla News: ‘कयामत से कयामत तक’ पाहिल्यानंतर मला जुही चावलासोबत लग्न करायचे होते, असं आर. माधवनने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

Chetan Bodke

R Madhavan Wanted To Marry Juhi Chawla

अभिनेता आर. माधवन सध्या ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच आर माधवनने मुलाखतीमध्ये एक खुलासा केला आहे. जुही चावलासोबत त्याला लग्न करायची इच्छा होती, असं त्याने मुलाखतीत सांगितले आहे. इतकंच नाही तर त्याने ती इच्छा आपल्या आईजवळ सुद्धा व्यक्त केली होती. ‘लग्न करेल तर जूही सोबतच...’ असं त्याने स्वत: आईला सांगितलं होतं. हा नक्की काय किस्सा आहे, जाणून घेऊया...

आर माधवनसोबत जुही चावला सुद्धा नेटफ्लिक्सच्या ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आर माधवनने सांगितले, ‘मला जुहीजी आणि सर्वांसमोर कबूल करायचे आहे की, मी जुहीचा ‘कयामत से कयामत तक’ पाहिल्यानंतर मी माझ्या आईला मला जुही चावलासोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले. तिच्या सोबत लग्न करणे हे माझे ध्येय होते, हे सुद्धा मी माझ्या आईला सांगितले.’ (Bollywood Film)

‘कयामत से कयामत तक’ मध्ये जुही चावलासोबत अमिर खानही प्रमुख भूमिकेत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन मंसूर खानने केले होते. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटाला ८ फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटातून जुही चावलाला ‘सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार’ मिळाला होता.

प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैलने या सीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘द रेल्वे मेन’ (The Railway Men) ची निर्मिती YRF एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांनी एकत्रित येऊन केली आहे. तर या वेबसीरीजची कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे. के मेनन, आर माधवन, बाबिल खान आणि दिव्येंदु मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT