R Madhavan FTII President: FTII अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच आर. माधवन पुणे दौऱ्यावर; विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत साधला संवाद

R Madhvan FTII News: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आर माधवन यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
R Madhavan FTII President
R Madhavan FTII PresidentSaam Tv
Published On

R Madhavan Accept Responsibility Of President of FTII

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आर माधवन यांची काही दिवसांपूर्वी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी गेल्या निवड करण्यात आली. आता त्यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी स्वीकारताच आर. माधवन यांनी पुण्यातील FTII च्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी आणि शिक्षकांसोबतही बैठक घेतली.

R Madhavan FTII President
Leo Trailer: विजय थलपती अन् संजूबाबाची अफलातून केमिस्ट्री; अवघ्या काही वेळातच पार केला कोट्यवधींचा टप्पा...

FTIIच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी संस्थेतील सोयीसुविधा, संस्थेतील कामकाज आणि FTIIच्या अभ्यासक्रमाचाही आढावा घेतला. त्यासोबतच विद्यार्थी, संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबतही संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाजघटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

१ सप्टेंबरला माहिती आणि प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीटर एक्सच्या माध्यमातून अध्यक्षपदाची घोषणा केली होती. घोषणा करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि उच्च स्तरावर नेईल. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.” अशा शब्दात त्यांनी अभिनेत्याचे कौतुक केले होते.

R Madhavan FTII President
Betting App case: अभिनेत्री श्रद्धा कपूरला ईडीकडून समन्स, कपिल शर्माचीही चौकशी होणार; काय आहे प्रकरण?

आर. माधवन यांच्या सिनेकारकिर्दिबद्दल सांगायचे झाल्यास, आर. माधवन यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी सिनेसृष्टीमधील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य साकरली आहे. अलीकडेच आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.

‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ हा २०२२ चा भारतीय चरित्रात्मक चित्रपट आहे. याचं लेखन, निर्मित आणि दिग्दर्शित आर माधवन यांनी केली आहे. नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात आर. माधवनने प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

R Madhavan FTII President
Mahadev Betting App Case: मोठी बातमी! कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खानला ईडीने बजावलं समन्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com