नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषद ५० वी बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सिनेमागृहातील खाद्यपदार्थांवर लावण्यात येणारे जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर पीव्हीआर आयनॉक्सने खाद्यपदार्थाच्या दरात मोठा बदल केला आहे . (Latest Marathi News)
प्रेक्षकांच्या मागणीची पूर्तता करत भारतातील सर्वात मोठ्या मल्टीप्लेक्स साखळी पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडने एफअॅण्डबीसाठी नवीन आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व पीव्हीआर आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
आजपासून चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षक सोमवार ते गुरूवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत फक्त ९९ रूपयांपासून सुरू होणारे हॉटडॉग्ज, बर्गर्स, पॉपकॉर्न व सँडविचेस् अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
या सुटीच्या दिवशी चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ इच्छिणारे चित्रपटप्रेमी बॉटमलेस पॉपकॉर्न खरेदी करू शकतात, ज्यामध्ये अनिलिमिटेड टब रिफिल्स, तसेच आकर्षक दरातील फॅमिली मील कॉम्बो यांचा समावेश आहे, ज्यामुळे एफअॅण्डबीचा खर्च जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. यामुळे सिनेमागृहातील खाद्यपदार्थांचे दर कमी झाले आहेत.
याबाबत पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली यांनी प्रतिक्रिया दिली आहे . संजीव कुमार बिजली म्हणाले, 'प्रेक्षकांशी संलग्न होणे हे सिनेमागृह यशस्वीपणे कार्यान्वित राहणार याकरिता महत्त्वाचे आहे. आम्ही प्रेक्षकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आमच्या सिनेमागृहांमध्ये आल्यानंतर त्यांना अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देण्याची आमची इच्छा आहे'.
'आम्ही आमच्या एफअॅण्डबी किंमतीबाबत ग्राहकांचे मत ऐकून घेत आहोत. म्हणून आम्ही किफायतशीर एफअॅण्डबी डिल्स डिझाइन केल्या आहेत, ज्या चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासोबत त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील करतील,' असेही संजीव कुमार बिजली म्हणाले.
'आमचे सर्व अतिथी आमच्या सर्वोत्तम एफअॅण्डबी ऑफरिंग्जचा आस्वाद घेतील, या दिशेने आमचा प्रयत्न आहे. यामध्ये लोकप्रिय सिनेमा स्नॅक्ससोबत आमच्या शेफच्या उच्च कुशल टीमने तयार केलेल्या गॉर्मेट ऑफरिंग्जचा देखील समावेश आहे. आम्हाला आमच्या अतिथींसाठी ही सर्वोत्तम ऑफर घेऊन येण्याचा आनंद होत आहे आणि यामुळे त्यांच्यासोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.