Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : जामीन मंजूर, तरीही अल्लू अर्जुन का राहिला रात्रभर जेलमध्ये? नेमकं कारण काय?

Allu Arjun Spends Night in Jail Despite Bail : 'पुष्पा 2' प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेने आपला जीव गमावला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र अखेर त्याला जामीन मंजूर झाला आहे.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2 ) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. काल सकाळी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र अखेर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. तेलंगण हायकोर्टने अल्लू अर्जुनला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. तरी देखील अल्लू अर्जुनने रात्र जेलमध्ये का काढली जाणून घ्या.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने जगभराला वेड लावले आहे, मात्र हैदराबाद मध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या स्कीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात अल्लू अर्जुनला काल (13 डिसेंबर ) अटक करण्यात आली होती.

अल्लू अर्जुनला काल सकाळी अटक केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र रात्री त्याला जामीन मंजूर करण्यात आला. हायकोर्टाकडून हा जामीन मंजूर झाला आहे. तरीही देखील अल्लू अर्जुनला एक रात्र कारागृहात काढावी लागली. कारण काल रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामीनाचे कागदपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे अभिनेता रात्रभर जेलमध्ये राहिला.

अखेर आज सकाळी साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन कारागृहातून बाहेर आला. तेलंगणा उच्च न्यायालयाने ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जामीनावर अल्लू अर्जूनचा अंतरिम जामीन मंजूर केला. आज सकाळी (शनिवारी) ७-८ वाजताच्या सुमारास चंचलगुडा सेंट्रल जेलमधून अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली.

4 डिसेंबर 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शोसाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठे संख्येने लोक तेथे आली होती. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT