Pushpa 2  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Pre-Booking: झुकेगा नही! 'पुष्पा 2'ची रिलीजआधीच बंपर कमाई; परदेशातही बोलबाला, कोट्यवधी रुपयांची कमाई

Pushpa 2 Pre-Booking Collection: 'पुष्पा 2' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई केली आहे. प्री-बुकिंगमध्ये किती कमावले जाणून घ्या.

Shreya Maskar

बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2 : द रुल' (Pushpa 2: The Rule) चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन पुन्हा मन जिंकायला सज्ज आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षक सुद्धा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळेच 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाने रिलीज आधीच बंपर कमाई केली आहे.

'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाने भारतातच नाही तर विदेशालाही वेड लावले आहे. या चित्रपटाने अमेरिकेत तब्ब्ल दहा लाख डॉलर कमावले आहेत. 'पुष्पा 2:द रुल' हा चित्रपटाचा प्रीमियर अमेरिकेत 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ऍडव्हान्स बुकिंगमध्ये (Pushpa 2 Pre-Booking Collection) चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. अमेरिकेत 850 लोकेशनवर या चित्रपटाची 40 हजार तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे निर्मात्याला दहा लाख डॉलरहून अधिक कमाईचा फायदा झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2:द रुल' चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 1000 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2:द रुल' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने 'पुष्पा 2:द रुल' चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 275 कोटींना विकत घेतले आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने अनेक हिट चित्रपट केले आहेत. जगभरात तिचे अनेक चाहते आहेत. तिच्या क्यूट स्माइलने ती चाहत्यांना घायाळ करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उबाठाचे पाच आमदार संपर्कात, 2-3 सोडता सर्व आमच्याकडे येणार; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

महिलांसाठी वरदान ठरतंय रिजनरेटिव्ह मेडिसिन; काय आहे ही नेमकी उपचार पद्धती?

VIDEO : मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल; विधानसभा निकालावर मनोज जरांगेंचा टोला

Mumbai : मुंबईच्या गोंगाटातून थोडी शांती हवीय? 'हे' पुरातन मंदिर ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT