Pushpa 2 Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Pushpa 2'ची रिलीज डेट पुन्हा बदलली; तर 'पुष्पा 3' बद्दल नवीन अपडेट समोर

Pushpa 2 Release Date : बहुप्रतीक्षित 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. त्यासोबतच 'पुष्पा 3'चे देखील नवीन अपडेट आले आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'पुष्पा 2'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' रिलीजला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'पुष्पा :द राईज' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली.

'पुष्पा 2 : द रुल' या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात चित्रपटाची रिलीजची नवीन तारीख दिसत आहे. आता 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे आणि या चित्रपटाचे प्रमोशनदेखील सुरू झाले आहे. यापूर्वी हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

'पुष्पा 2'नंतर चाहत्यांसाठी 'पुष्पा 3'ची ही नवी अपडेट समोर आली आहे. 'पुष्पा 3' साठीही चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविशंकर यांनी 'पुष्पा 3'बद्दल मोठी अपडेट दिली आहे. "ते म्हणाले की, प्रेक्षकांनी 'पुष्पा 2'ला चांगला सपोर्ट केला तर नक्कीच 'पुष्पा 3' चा विचार करू.'पुष्पा 3' साठी त्यांच्याकडे चांगली लीड देखील आहे."

तसेच या संदर्भात अल्लू अर्जुन 'पुष्पा 3' बद्दल म्हणाला की, " रवि शंकर म्हणाले आहेत की, 'पुष्पा 3' वर काम चालू आहे." प्रेक्षक 'पुष्पा 2' च्या रिलीज आधीपासूनच 'पुष्पा 3'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' ने रिलीज आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. 1085 कोटींची एकूण प्री-रिलीझ कमाई 'पुष्पा 2'ची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

SCROLL FOR NEXT