Tirupati Laddu Controversy: आता वेळ आली आहे..., तिरुपती बालाजी प्रसादावरून संतापले श्री श्री रविशंकर

Sri Sri Ravi Shankar On Tirupati Laddu Controversy: तिरूपती बालाजी मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून सुरू असलेल्या वादावर श्री श्री रविशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Tirupati Laddu Controversy: आता वेळ आली आहे..., तिरुपती बालाजी प्रसादावरून संतापले श्री श्री रविशंकर
Sri Sri Ravi Shankar On Tirupati Laddu ControversySaam Tv
Published On

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. लाडू प्रसादामध्ये भेसळ केल्याप्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

श्री श्री रविशंकर यांनी मंदिराचे व्यवस्थापन धार्मिक नेते आणि भाविकांकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली होती. तिरुपती बालाजी लाडू प्रसाद वादावर श्री श्री रविशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्री श्री रविशंकर यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'तिरुपती बालाजी लाडू प्रसाद वादामुळे हिंदूंच्या मनात खोल घाव आणि संताप निर्माण झाला आहे. आता वेळ आली आहे की मंदिराचे व्यवस्थापन स्वार्थी अधिकारी, निर्दयी व्यापारी आणि राजकीय नेत्यांऐवजी धार्मिक नेते आणि भक्तांच्या हातामध्ये सोपवण्यात यावे.' श्री श्री रविशंकर यांनी या लाडू प्रसादातील भेसळ प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

Tirupati Laddu Controversy: आता वेळ आली आहे..., तिरुपती बालाजी प्रसादावरून संतापले श्री श्री रविशंकर
Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. तिरुपती लाडू प्रसाद वादावर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सांगितले होते की, 'तिरुपती बालाजी प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याच्या मुद्द्यामुळे आम्ही सर्वजण खूपच चिंतेत आहोत. तत्कालीन YCP सरकारने स्थापन केलेल्या TTD बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आमचे सरकार शक्य तितकी कठोर कारवाई करेल.'

तसंच, याप्रकरणावर आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी सांगितले होते की, 'मुख्यमंत्री यावर निवेदन देतील. सीबीआय चौकशीची मागणी करतील. आम्ही कोणालाही सोडणार नाही. मात्र आम्ही हे प्रकरण केवळ सीबीआयच्या तपासावर सोडणार नाही.'

Tirupati Laddu Controversy: आता वेळ आली आहे..., तिरुपती बालाजी प्रसादावरून संतापले श्री श्री रविशंकर
Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com