तिरुपती : तिरुपती बालाजी सर्वात श्रीमंत देवस्थान आहे, हे आपण ऐकत आलो आहोत. किंबहुना आता हे सर्वांना माहित झालंय. मात्र या देवस्थानची श्रीमंती किती आहे. आकड्यांमध्ये सांगता येणं कठीण होतं. मात्र आता देवस्थाननेच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे. (Latetst Marathi News)
तीन वर्षात संपत्तीत वेगाने वाढ
ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, सध्याच्या ट्रस्ट बोर्डाने 2019 पासून आपली गुंतवणूक गाईडलाईन्स मजबूत केल्या आहेत. 2019 मध्ये अनेक बँकांमध्ये 13,025 कोटी रोकड होती, ती वाढून 15,938 कोटी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीत 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, तिरुपतीकडे 2019 मध्ये ट्रस्टची अनेक बँकांमध्ये 7339.74 टन सोन्याच्या ठेवी होत्या, ज्यात गेल्या तीन वर्षांत 2.9 टनांनी वाढ झाली आहे.
देणगीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती मंदिर आहे. मंदिरात विविध ठिकाणी 7 हजार 123 एकरात पसरलेल्या एकूण 960 मालमत्ता आहेत. चांदीपासून ते मौल्यवान दगड, नाणी, कंपनीचे शेअर्स आणि मालमत्ता यासारख्या वस्तूही येथे दान केल्या जातात.
दक्षिण भारतातील सर्व मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजी मंदिर सर्वात लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.