KGF Star Update: कन्नड सुपरस्टार यशने राजकारणातील त्याच्या प्रवेशाबद्द्दल मोठा खुलासा केला आहे. 'केजीएफ' आणि 'केजीएफ 2'मधील भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या या अभिनेत्याने कबूल केले की त्याचा राजकारणात येण्याचा विचार नाही. 'केजीएफ'मधील 'रॉकी भाई' म्हणूनही ओळखला जाणारा अभिनेता यशने सांगितले आहे की, राजकारण हा थॅंकलेस जॉब आहे आणि त्याला या क्षेत्रात येण्याची अजिबात इच्छा नाही.
“आधी मला स्वतःमध्ये आणि माझ्या इंडस्ट्रीत खूप बदल करायचे आहेत. माझ्या मर्यादेत राहून मी समाजातील गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करेन. काही लोकांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही अनेक गोष्टी करत आलो आहोत. राजकारण हे एक कृतघ्न काम आहे आणि मला त्यात स्वारस्य नाही, असे यश एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला आहे.
या कार्यक्रमात यशाने त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ 3'बद्दल अपडेट देखील दिली आहे. यशाने सांगितले की, 'केजीएफ 3'ला तो इतक्यात सुरूवात करणार नाही. “आमच्याकडे एक योजना आहे, परंतु हा चित्रपट लवकर करण्याचा आमचा हेतु नाही. मला अजून काहीतरी वेगळे करायचे आहे. 6-7 वर्षांपासून मी 'केजीएफ' करत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर आम्ही नंतर 'केजीएफ 3' करू,". यशाने चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, तो लवकरच त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा करणार आहे. (Movie)
'ब्रह्मास्त्र 2'साठी बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी सोबत चर्चा करत असल्याच्या अफवांविषयी देखील यशाला विचारण्यात आले. त्यावर यशने मला सध्या आणि सरळ गोष्टी करायच्या नाही असे सांगितले. यशला 'ब्रह्मास्त्र भाग 2'मध्ये देवची भूमिका साकारण्यासाठी संपर्क साधण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. करण जोहरने एका मुलाखतीत या अफवांचे खंडन केले आहे. (Bollywood)
'केजीएफ' स्टार यशला कितीतरी मोठे करायचे आहे. 'केजीएफ'मधील त्याची भूमिका प्रचंड वेगळी होती. आता या भूमिकेनंतर त्याला कोणतीही साधी, सरळ भूमिका करायची नसल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच त्याला कुठल्याच बॅनरखाली काम न करता काहीतरी खूप मोठे करायचे आहे, असे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.