Pushpa 2 Movie Song  Saam TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 stamped : पुष्पा 2 प्रकरणात नवा ट्विस्ट ; यूट्यूबवरून हटवावं लागलं 'हे' गाणं

Pushpa 2 stamped case : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असली तरी चित्रपटाबाबतचे वादही वाढत आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावरुन निर्मात्यांनी चित्रपटातील एक गाणे हटवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pushpa 2 stamped : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चित्रपटाने पोलिसांचा अवमान केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाविरोधात आणखी एक तक्रार दाखल केली होती. आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे 'पुष्पा 2'चे एक गाणे यूट्यूब वरून डिलीट करण्यात आले आहे.

पुष्पा 2 चे 'दमुंते पट्टुकोरा' हे गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले आहे. टी-सीरीजने रिलीज केलेले हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले असून अल्लू अर्जुनने गायले आहे. या गाण्याचे बोल दिग्दर्शक सुकुमार यांनी लिहिले आहेत. T-Series ने 24 डिसेंबर रोजी हे गाणे रिलीज केले आणि त्याच्या बोल्ड बोल आणि चुकीच्या टायमिंगमुळे हे गाण्याने खूप चर्चेत होते. जर तुम्ही हे गाणे ऐकले असेल तर तुम्हाला ते का डिलीट करावे लागले ते समजले असेल.

वास्तविक, या गाण्यात अल्लू अर्जुनने चित्रपटात पोलीस अधिकारी शेखावतची भूमिका करणाऱ्या फहद फासिलला आव्हान दिले आहे. या गाण्याचा अर्थ असा आहे की, ' शेखावत तुझ्यात हिम्मत असेल तर मला पकडून दाखव'. या गाण्याच्या बोलामुळे या गाण्याने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाण्याच्या वेळेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत निर्मात्यांना हे गाणे सोशल मीडियावरून हटवावे लागले.

काय प्रकरण आहे?

खरंतर, पुष्पा 2 च्या रिलीजच्या दिवशी म्हणजेच 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती ज्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी 13 डिसेंबरला अभिनेत्याला अटक केली होती, मात्र त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT