Pushpa 2 Box Office Collection Day 9 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 9: 'पुष्पा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, कलेक्शन किती?

Pushpa 2 Worldwide Collection : 'पुष्पा 2' चित्रपटाची जादू अजूनही बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमी वेळात जगभरात १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता चित्रपटाचे ९व्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र पुष्पा भाऊचे राज्य पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' रिलीजपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'पुष्पा 2' हा (Pushpa 2) ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाने जगाल वेड लावले आहे. या चित्रपटाने ९ दिवसात किती कोटी रुपये कमावले जाणून घेऊयात.

'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन दिवस 9

'पुष्पा2' पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 164.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई झाली. चित्रपटाने चौथ्या दिवशी 141.5 कोटींची तर पाचव्या दिवशी 65.1 कोटी रुपयांची तगडी कमाई केली. सहाव्या दिवशी पुष्पा राजने 52.50 कोटी रुपये कमावले. सातव्या दिवशी 42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आठव्या दिवशी हिंदी चित्रपटाने 425.1 कोटी कमावले. तर तसेच पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले.

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने रिलीजच्या 9व्या दिवशी (Pushpa 2 Box Office Collection Day 9) हिंदी भाषेत 27 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. 9 दिवसात हिंदीत 'पुष्पा 2'ने 452.6 कोटी रुपये कमावले आहेत. तर सर्व भाषांमध्ये मिळून चित्रपटाने आतापर्यंत 762.6 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तर जगभरात 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात (Worldwide Collection) 1060 कोटी रुपये कमावले आहेत.

'पुष्पा 2'ने ॲनिमल, बाहुबली, जवान आणि स्त्री 2 सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'पुष्पा 2' सुकुमार दिग्दर्शित चित्रपट आहे. हा चित्रपट पाच भाषेत रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT