
नवी दिल्ली : बेंगळुरुमधील एआय इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टातील आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. सुप्रीम कोर्टातील या प्रकरणात न्यायाधीशांनी नवऱ्याला बायकोला ५ कोटी रुपये पालनपोषणासाठी देण्याचा आदेश दिलाय. कोर्टाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात एक रकमी पोटगी म्हणून बायकोला ५ कोटी रुपये देण्याचा आदेश दिला होता. तसेच लहान मुलांनाही एक कोटींची सोय करण्यास सांगितले होते.
एका मिडिया रिपोर्टनुसार, कोर्टाचा हा निर्णय इंजिनीअर अतुल सुभाष प्रकरणादरम्यान समोर आला आहे. अतुल सुभाष यांनी बायकोच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं होतं. त्यांनी चिठ्ठीत अनेक दावे केले होते. त्यानंतर आणखी एक प्रकरण समोर आलं. सुप्रीम कोर्टातून समोर आलेल्या या प्रकरणात नवरा आणि बायको गेल्या दोन दशकांपासून वेगळे राहत होते.
दोघे लग्नानंतर सहा वर्ष एकत्र राहिले होते. पत्नीचा आरोप आहे की, पतीची वर्तवणूक चांगली नव्हती. कोर्टाने इतक्या काळापासून दोघे दूर राहत असल्याने दोघांचं लग्नाचं नातं संपुष्टात आल्याचे मान्य केलं. या प्रकरणात पालनपोषणाशी संबंधित अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, पालनपोषणाचा खर्च ठरवताना एकरकमी पोटगीची रक्कम त्याला शिक्षा वाटू नये, अशी ठरवली जाऊ नये. यावेळी पत्नीला ५ कोटींचा पालनपोषणाचा खर्च देण्याचे आदेश देताना २०२१ सालच्या रजनीश विरुद्ध नेहा आणि २०२४ सालच्या अनीश प्रमोद पटेल आणि ज्योत मैनी प्रकरणाचाही उल्लेख केला. कोर्टाने ही रक्कम निश्चित करण्याचे काही कारणे सांगितली. दोन्ही पक्षकारांची आर्थिक स्थिती जाणून घेतली. पत्नी आणि मुलांच्या गरजा लक्षात घेतल्या. पतीच्या नोकरीचा विचार केला. त्यानंतर पत्नीची जीवनशैली पाहून एक रकमी पोटगीची रक्कम ठरवण्यात आली.
दरम्यान, बेंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष यांनी चिठ्ठी आणि व्हिडिओ रेकर्ड करून जीवन संपवलं. बायकोच्या छळाला कंटाळून पतीने जीवन संपवलं. अतुल सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी कमीत कमी दीड तास व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याचबरोबर २४ पानी चिठ्ठी लिहिली. अतुल हे बिहारचे राहणारे आहेत. त्यांनी त्यांची पत्नी निकीता, सासू आणि मेव्हण्यावर गंभीर आरोप केले. अतुल यांनी सासरच्या मंडळीनी मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच कौटुंबीक कोर्टाच्या न्यायाधीश रीता कौशिक यांच्यावरही छळाचे आरोप केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.