Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : पुष्पा भाऊचा जगात बोलबाला; पार केला 1200 कोटींचा टप्पा

Pushpa 2 Box Office Collection Day 33 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने 1200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.

Shreya Maskar

5 डिसेंबरला 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. हा एक ॲक्शन चित्रपट आहे. 2021मध्ये रिलीज झालेला 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिकासोबतच (Rashmika Mandanna) दोन्ही भागांमध्ये प्रेक्षकांना फहद फॉसिलची भूमिका खूप आवडली.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 33

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉस्क ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये कमावले. अकराव्या दिवशी 76.6 कोटींची कमाई केली. तर एकविसाव्या दिवशी 19.75 कोटी रुपये आणि एकतिसाव्या दिवशी 5.5 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने तेहत्तीसाव्या दिवशी 2.5 कोटी कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 'पुष्पा 2'चित्रपटाने 1206 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनआणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

'पुष्पा 2' चित्रपट गेल्या 30 वर्षांत तिसरा सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपट आहे. दुसऱ्या नंबरवर 1994 मध्ये रिलीज झालेला सलमान खानच्या 'हम आपके है कौन है' हा आहे. तर पहिल्या स्थानावर 'बाहुबली 2' आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1831 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या एक महिन्यानंतरही 'पुष्पा 2' थिएटर गाजवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT