Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'चा तिसऱ्या आठवड्यातही धमाका, 1000 कोटींचा टप्पा पार

Pushpa 2 Box Office Collection Day 16: 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटाने १००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे १६व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे. ५ डिसेंबरला 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही बंपर कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 725.8 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन 264.8 कोटी रुपये झाले. आतापर्यंत 'पुष्पा 2' चित्रपटाची 16 दिवसांची एकूण कमाई 1002.71 कोटी रुपये झाली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 16व्या दिवशी 12.11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 6 दिवसांत तेलगूमध्ये 297.8 कोटी रुपये, हिंदीमध्ये 632.6 कोटी रुपये, तामिळमध्ये 52.8 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.16 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 13.99 कोटी रुपयांचा बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 'बाहुबली 2'चा लवकरच रेकॉर्ड मोडणार आहे. आताप्रर्यंत चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये देखील बंपर कमाई केली होती. हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ज्यात तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आजही थिएटर बाहेर रांगा पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT