Most Popular Movie 2024: 'स्री 2 ते पुष्पा 2', 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी वाजवला डंका, केली रेकॉर्डब्रेक कमाई

Most Popular Movie: विविध भाषिक चित्रपटांमध्ये 2024 या वर्षात कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक बाजी मारली आहे हे आपण जाणून घेऊया.
Most Popular Movie 2024: 'स्री 2 ते पुष्पा 2', 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी वाजवला डंका, केली रेकॉर्डब्रेक कमाई
Published On

2024 मध्ये बॉलिवूड, टॉलीवूडसह अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत मोठे यश संपादन केले आहे. विविध भाषिक चित्रपटांमध्ये 2024 या वर्षात कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक बाजी मारली आहे हे आपण जाणून घेऊया.

सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ते म्हणजे बॉलिवूड अन् टॉलीवूड चित्रपटाची यंदाच्या वर्षात साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

Most Popular Movie 2024: 'स्री 2 ते पुष्पा 2', 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी वाजवला डंका, केली रेकॉर्डब्रेक कमाई
Meena Ganesh: अभिनेत्री मीना गणेश याचं निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१) स्त्री 2

श्रध्दा कपूरचा स्त्री 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. तर या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराणा यांच्याही भूमिका आहेत.

२) मुंज्या

आदित्या सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मुंज्या हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

Most Popular Movie 2024: 'स्री 2 ते पुष्पा 2', 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी वाजवला डंका, केली रेकॉर्डब्रेक कमाई
Pushpa 2 : संध्या थिएटर चेंगराचेंगरीतील जखमी मुलगा व्हेंटिलेटरवर ; अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी घेतली भेट

३) भूल भुलैया 3

कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 हा चित्रपट यंदाच्या वर्षात प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि विद्या बालन यांची भूमिका चित्रपटात आहे. माधुरी दिक्षीत अंजुलिका तर विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत आहेत.

४) काकुडा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख यांचा काकुडा हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. रितेश या चित्रपटात भुताच्या शिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ज्याने आपल्या शानदार कारकिर्दीत 127 चेटकीण, 72 व्हॅम्पायर, 37 भुते आणि 3 जिन्स यांना वश केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.

Most Popular Movie 2024: 'स्री 2 ते पुष्पा 2', 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी वाजवला डंका, केली रेकॉर्डब्रेक कमाई
Indrayani Marathi Serial: थंडा थंडा कूल कूल! नाशिकच्या 11 डिग्री तापमानात इंद्रायणी मालिकेचं शूटिंग

५) पुष्पा 2

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. ५ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने जगभरात चांगलाच गाजावाजा केला आहे. जगभरात या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत यश मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com